स्वतःचं इंटरनेट देणारं ‘हे’ आहे देशातलं पहिलं आणि एकमेव राज्य!

300

संपूर्ण जगभरात आता इंटरनेटचे जाळे पसरले आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक काना-कोपऱ्यात इंटरनेटची सेवा पोहोचली आहे. अशातच केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी गुरूवारी एक ट्विट करत केरळ हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य आहे, ज्याची स्वतःची इंटरनेट सेवा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे स्वत:ची इंटरनेट सेवा असलेले केरळ हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य ठरले आहे. केरळ फायबर ऑप्टिक नेटवर्क लिमिटेडला दूरसंचार विभागाकडून इंटरनेट सेवा प्रदाता (ISP) परवाना मिळाला आहे.

(हेही वाचा – मुख्यमंत्री शिंदेंच्या विधानसभेतील भाषणाचं मोदींनी केलं कौतुक, म्हणाले…)

मिळालेल्या माहितीनुसार, केरळ फायबर ऑप्टिक नेटवर्क लिमिटेड हा राज्यातील प्रत्येकाला इंटरनेटचा वापर सुनिश्चित करण्यासाठी सरकारचा महत्त्वाकांक्षी आयटी पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्या आली आहे. तसेच केरळ फायबर ऑप्टिक नेटवर्क लिमिटेड, दूरसंचार विभागाकडून इंटरनेट सेवा प्रदाता परवाना मिळाल्यानंतर समाजातील डिजिटल फूट कमी करण्यासाठी या प्रकल्पांतर्गत काम सुरू करता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, या सेवेमार्फत राज्य सरकार २० लाख कुटुंबांना मोफत वाय-फाय देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे केरळ सरकारने १ हजार ५४८ कोटींची फायबर ऑप्टिक नेटवर्क योजना मंजूर केली होती. या योजनेंतर्गत साधारण २० लाख गरीब कुटुंबांना फ्री हायस्पीड इंटरनेट सेवा देण्यात येणार आहे. याशिवाय राज्यातील ३० हजारांहून अधिक सरकारी कार्यालये आणि शाळादेखील या योजनेशी जोडल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.