केरळमधील पीएफआयच्या मोर्च्यात हिंदुविरोधी प्रक्षोभक घोषणा

128
केरळमध्ये काश्मिरात ज्याप्रमाणे ९०च्या दशकात काश्मिरी पंडितांना काश्मीर सोडून जाण्याचा आदेश देण्यात आला होता. त्याप्रमाणे घोषणा चक्क केरळ येथे पीएफआयच्या मोर्च्यात देण्यात आल्या. एका अल्पवयीन मुलाने पीएफआयच्या मोर्च्यात हिंदूंच्या विरोधात प्रक्षोभक घोषणा केल्या. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. या व्हिडिओचा प्राथमिक तपास केल्यानंतर पीएफआयचे अलप्पुझा जिल्ह्याचे अध्यक्ष नवास वंदनम जिल्हा सचिव मुजीब यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कलम १५३ अ अंतर्गत गुन्हा नोंदवला

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने काढलेल्या मोर्चादरम्यान अल्पवयीन मुलगा प्रक्षोभक घोषणा देत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. या व्हिडिओचा प्राथमिक तपास सुरू केल्यानंतर केरळ पोलिसांनी मंगळवारी, २३ मे रोजी  पीएफआयच्या या मोर्च्याच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी पीएफआयचे अलप्पुझा जिल्हा अध्यक्ष, सचिव आणि इतर ओळखीच्या व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम १५३ अ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. केरळ पोलिसांनी पुढे सांगितले की, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या एका कार्यकर्त्याला केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन समुदायाशी संबंधित लोकांविरुद्ध द्वेषपूर्ण घोषणा देताना एका व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात ताब्यात घेण्यात आले होते. केरळ पोलिसांनी सोमवारी सांगितले की, त्यांनी एका व्हायरल व्हिडिओची चौकशी सुरू केली आहे, ज्यामध्ये एक मुलगा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) मोर्चात कथितरित्या प्रक्षोभक घोषणा देताना दिसत आहे. केरळ येथील हिंदू आणि ख्रिश्चन लोकांनी शेवटचे धार्मिक संस्कार करावे लागणार आहे, अशी धमकी पीएफआयने दिली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.