इस्रायल आणि हमास यांच्यातील दिवसेंदिवस चांगलाच पेटत आहे. इराणने आता उघडपणे हमासला पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे.पण सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या इस्त्रायली पोलिसांची वर्दी भारतातच बनवली जाते. इतकेच नव्हे तर कैद्यांचे गणवेशही बनवले जातात. तर हे गणवेशही केरळमधील कारखान्यात तयार केले जातात. हे महिलांचे यात मोठ्या संख्येने सहभाग आहे. खरंतर हमासच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या इस्त्रायली सुरक्षा दलांशी केरळ राज्याचे व्यापारी संबंध आहेत. विशेष म्हणजे यामध्ये १३००महिलांचा समावेश आहे. (Israel Police)
केरळमधील कन्नूर येथील एका कपड्याच्या कारखान्यातील कर्मचारी एकजुटीने काम करत आहेत. कन्नूरच्या कुथुपरंबा शहरातील मेरियन गारमेंट्स कारखाना गेल्या ८ वर्षांपासून इस्रायली पोलिसांसाठी वर्दी तयार करत आहे. इस्रायलमध्ये अचानक आलेल्या या आपत्तीमुळे या कारखान्याला वेळेपूर्वीच वर्दी शिवण्यास सांगण्यात आले आहे. अशा स्थितीत या कारखान्यात रात्रंदिवस काम सुरू आहे. मेरियन गारमेंट्सचे एमडी थॉमस ओलिकल यांच्या मते, या कारखान्याला दरवर्षी १२००० स्ट्रेच शर्ट आणि पँट अशी वर्दी शिवण्याच्या ऑर्डर मिळतात. आता या युद्धाच्या वातावरणात या कारखान्याला लवकरात लवकर वर्दी पाठवण्यास सांगण्यात आले आहे. अशा स्थितीत या कारखान्यात काम जोरात सुरू आहे. (Israel Police)
(हेही वाचा : Mumbai Police : मुंबई मध्ये प्रवास करताना खाकी वर्दीतील सखी येणार मदतीला)
२०१५ पासून ही कंपनी वेगवेगळ्या देशांसाठी कपडे बनवते. या कारखान्याला इस्रायल पोलीस दलाच्या वर्दीच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. मरियम गारमेंट्स इस्रायली पोलिस दलासाठी डार्क नेव्ही ब्लू, स्काय ब्लू आणि लाइट ग्रिन, अशा तीन प्रकारच्या वर्दी बनवत आहे. या कारखान्याचे मुख्यालय मुंबईत आहे. इस्त्रायली पोलीस विभाग मेरियन गारमेंट्समधून वर्दी शिवत आहे. हे कापूस आणि पॉलिस्टर फॅब्रिक्स आहेत. इस्रायलने घातलेली अट अशी आहे की, ते एका अमेरिकन फर्मकडून स्पेशल पॉलिस्टर आयात करतील आणि त्यातून कपडे शिवतील. मेरियन गारमेंट्स दरवर्षी इस्रायलला अंदाजे १ लाख ४० हजार गणवेश शिवते आणि पुरवते. यामध्ये १ लाख वर्दी पोलिसांसाठी तर २५ ते ४० हजार गणवेश कारागृहातील कैद्यांसाठी आहेत. याशिवाय, हा कारखाना कुवेत सुरक्षा दल, कतार सुरक्षा दल, सौदी अरेबिया, फिलिपाइन्स इत्यादी देशांच्या लष्करी दलांना वर्दी पुरवतो. कन्नूरमधील मरीन गारमेंट्स युनिटमध्ये सुमारे १५०० लोक काम करतात. या महिलाच इस्रायली सैनिक आणि कैद्यांचे गणवेश तयार करतात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community