पुण्यातील ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांना अटक करण्यात आली आहे. रिक्षा आंदोलनावेळी चक्काजाम केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
सोमवारी झालेल्या रिक्षा आंदोलनावेळी चक्काजाम केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सोमवारी संध्याकाळी रिक्षा चालकांनी आरटीओ चौकात रिक्षा रस्त्यात लावल्या होत्या. रात्री उशिरा पोलिसांनी येऊन त्या बाजूला केल्या. यावेळी 30-40 रिक्षा चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आता या याप्रकरणी कारवाई करत,’बघतोय रिक्षावाला’ संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांना पोलिसांनी अटक केली आहे.
( हेही वाचा: PMGKAY: मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मोदी सरकारचा मोठा निर्णय )
आंदोलनावेळी नेमकं काय घडलं
पुण्यात रिक्षा चालकांनी बेकायदा बाईक-टॅक्सी विरोधात सोमवारी आंदोलन केले. संगम ब्रीज येथील आरटीओ कार्यालयासमोर मोठ्या संख्येने रिक्षा चालक या आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, अनेक रिक्षा चालकांनी आपली रिक्षा ही रस्त्यावरच सोडून दिली. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. सुमारे 16 रिक्षा संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. रस्त्यात रिक्षा सोडल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. रात्री आठ वाजल्यानंतर दंगल नियंत्रण पथक रस्त्यावर उतरले. पोलिसांनी रिक्षाचालकांना रिक्षा हटवण्याचे आवाहन केले. मात्र रिक्षाचालकांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने पोलिसांनी कारवाई करण्यात सुरुवात केली.
Join Our WhatsApp Community