अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे. 2020 च्या अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार, केतकीला अटक करण्यात आली आहे. 2020 मध्ये रबाळे पोलीस ठाण्यात केतकी चितळेवर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होता. आता यावर ठाणे न्यायालयाने केतकी चितळेला 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे.
2020 च्या प्रकरणात न्यायालयाचा निर्णय
केतकी चितळेविरोधात वर्ष 2020 मध्ये अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार, तिच्याविरोधात गुन्हा दाखल होता. केतकीने सोशल मीडियावर अनुसूचित जाती जमातींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या पोस्ट प्रकरणी अॅड. स्वप्नील जगताप यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर याता रबाळे पोलिसांनी गुरुवारी कारवाई करत तिला ठाणे कारागृहातून ताब्यात घेत अटक केली आहे.
( हेही वाचा: राज ठाकरेंवर लिलावतीत शस्त्रक्रिया होण्याची शक्यता )
केतकी चितळेच्या अडचणीत वाढ
शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणात सध्या केतकी चितळे न्यायालयीन कोठडीत होती. तिच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे. केतकी व्हाॅट्सअॅपचा वापर करत नसून फक्त फेसबुक आणि SMS च्या माध्यमातून सक्रिय असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
Join Our WhatsApp Community