राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे. केतकीला ठाणे सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यामुळे पोलीस कोठडीत असलेल्या केतकीला काहीसा दिलासा मिळाला आहे.
14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
काल मंगळवारी केतकीच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे तिला आज बुधवारी, ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. असे सांगितले जात आहे की, यानंतर केतकीचा गोरेगाव पेलिसांकडे असेलला ताबा काढून घेतला जाणार आहे. दरम्यान, केतकी चितळेकडून जामिनासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे.
(हेही वाचा – केतकीला झालेला ‘एपिलेप्सी’ आजार नेमका आहे तरी काय?)
केतकीने स्वत:च बाजू न्यायालयात मांडली
रविवारी सुटीच्या न्यायालयात पोलिसांनी केतकीला हजर केले होते. यावेळी तिने आपली बाजू मांडण्यासाठी वकिलाची नियुक्ती करण्याऐवजी स्वत:च आपली बाजू न्यायालयासमोर मांडल्याचे दिसून आले. केतकीने न्यायालयात सांगितलं की, ती पोस्ट माझी नाही. ती मी सोशल मीडियातून कॉपी करुन पोस्ट केली होती. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणे गुन्हा आहे का? असा सवाल देखील तिने केला. केतकीने सुनावणीदरम्यान वकील घेतला नाही, तिने स्वतः न्यायालयात युक्तिवाद केला. केतकीने सांगितले की, मी या पोस्ट डिलीट करणार नाही. माझा तो अधिकार आहे. शनिवारी रात्री ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख आणि कृष्णा कोकणी यांच्या पथकाने तिला अटक केली होती.
Join Our WhatsApp Community