कॅनडात खलिस्तानी समर्थकांकडून भारतीयांना मारहाण, दिवाळीच्या कार्यक्रमात निंदनीय कृत्य

148

खलिस्तानी संघटनेचे निंदनीय कृत्य पुन्हा एकदा समोर आले आहे. कॅनडात दिवाळी निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात खलिस्तानी समर्थकांकडून भारतीय समुदायावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. यामध्ये काही भारतीयांना मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दिवाळीनिमित्त कॅनडातील मिसिगॉग येथे भारतीयांनी एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीमध्ये खलिस्तानी समर्थकांनी घुसखोरी केली. यावेळी काही खलिस्तानी समर्थक भारतीय समुदायाच्या लोकांना भिडले. त्यानंतर खलिस्तान्यांकडून भारतीयांना मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुख्य म्हणजे ही घटना घडत असताना उपस्थित असलेल्या पोलिसांनी केवळ बघ्यांची भूमिका घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

खलिस्तान्यांच्या भारतविरोधी कारवाया

कॅनडामध्ये गेल्या काही दिवसांपासून खलिस्तान्यांनी विघातक गोष्टींना सुरुवात केली आहे. कॅनडातील मंदिरांवर हल्ले करणे आणि मंदिरांच्या भिंतींवर खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा लिहिणे अशी कृत्ये खलिस्तानी समर्थकांकडून करण्यात येत आहेत. कॅनडात खलिस्तानी समर्थकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांच्याकडून भारतविरोधी कारवाया करण्यात येत आहेत.

भारताकडून निषेध

खलिस्तान्यांकडून होत असलेल्या कारवायांचा निषेध भारत सरकारने कॅनडा सरकारडे नोंदवला आहे. मात्र तरीही अजून खलिस्तानी समर्थक किंवा खलिस्तानी चळवळींशी संबंधित व्यक्तींवर कुठलीही कारवाई कॅनडा सरकारकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे कॅनडा सरकार हे खलिस्तान्यांच्या ताटाखालचे मांजर असल्याचे आरोप करण्यात येत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.