विधानसभा भवनाच्या बाहेर खलिस्तानी झेंडे; ‘हे’ राज्य हाय अलर्टवर

हिमाचल प्रदेशाच्या विधानसभा भवनाच्या मुख्य द्वारावर खलिस्तानी झेंडे आणि काही घोषणा लिहिलेले फलक बांधल्याचे रविवारी आढळून आले. बाहेरील भिंतीवर खलिस्तानचे समर्थन करणा-या घोषणाही लिहिण्यात आल्या आहेत. मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंतच्या वेळात हे झेंडे लावण्यात आले असावेत. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत, अशी माहिती कांगडाचे पोलीस निरीक्षक खुशाल शर्मा यांनी दिली.

समाज विघातक घटकांनी घेतला फायदा

सध्या संबंधित झेंडे काढून टाकण्यात आले आहेत. तसेच बाहेरील भिंतीवर लिहिलेल्या घोषणा पुसण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकून यांनी कृत्याचा निषेध केला आहे. या विधानसभेत फक्त हिवाळी अधिवेशन आयोजित केले जाते. त्यामुळे याठिकाणी फारशी सुरक्षा व्यवस्था तैनात नसते. याचा फायदा काही समाज विघातक घटकांनी घेतला आहे. असे ट्वीट ठाकून यांनी केले आहे.

काही ट्वीट्स

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी ट्वीट करत म्हटले की, समाजविघातक घटकांकडून देशातील शांतता व सौहार्दाचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, खलिस्तानचे झेंडे लावले जाणे हे भाजप सरकारचे अपयश आहे. हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रश्न आहे. राज्यातील लोकांचा आदर राखण्यात सरकार अपयशी ठरले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here