पुणे-सातारा महामार्गावरील प्रवास लवकरच होणार वेगवान

पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटातील बोगदा मार्च 2023 पर्यंत होणार पूर्ण

110

पुणे-सातारा महामार्गावरील (एनएच-4) खंबाटकी घाटातील नवीन सहापदरी बोगदा हा प्रत्येकी 3 मार्गिका असलेला दुहेरी बोगदा आहे. सध्या त्याचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

(हेही वाचा – पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा)

पुणे-सातारा प्रवास होणार वेगवान

याबाबत गडकरी म्हणाले की, सातारा-पुणे दिशेला असलेला सध्याचा ‘एस’ वळणमार्ग लवकरच पूर्ण होईल त्यामुळे अपघात जोखमीत मोठी घट होईल. 6.43 किमी लांबीच्या प्रकल्पासाठी एकूण भांडवली खर्च अंदाजे 926 कोटी रुपये आहे आणि मार्च 2023 पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. पुणे-सातारा आणि सातारा-पुणे हा खंबाटकी घाटमार्गे अनुक्रमे 45 मिनिटे आणि 10-15 मिनिटांचा प्रवास वेळ आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर, या प्रवासाचा सरासरी वेळ कमी होऊन 5-10 मिनिटांवर येईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

वेळ आणि पैशांची होणार बचत

आपला देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पायाभूत सुविधांमधील अभूतपूर्व परिवर्तन अनुभवत आहे. संपर्क व्यवस्थेच्या माध्यमातून समृद्धी उलगडत आहे. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची मागणी नव भारत करत आहे. बोगद्यामुळे संपर्क व्यवस्थेत सुधारणा होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रवाशांना त्यांच्या वेळ आणि पैशात बचतीद्वारे थेट लाभ प्रदान करेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.