८ नोव्हेंबरला वर्षातील शेवटचे ग्रहण, महाराष्ट्रातून दिसणार खंडग्रास चंद्रग्रहण

153

नुकतेच २५ ओक्टोबरला खंडग्रास सूर्यग्रहण पहायला मिळाल्यानंतर देशातून आणि महाराष्ट्रातून ८ नोव्हेबरला पुन्हा खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. देशात पूर्वेत्तर भागात सर्वाधिक ९८ टक्के आणि ३ तास ग्रहण पहावयास मिळेल तर पश्चिम भारतातून केवळ १ तास १५ मिनिटे खंडग्रास चंद्र ग्रहण दिसेल. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यातून ५.३० वाजता तर मुंबई येथून ६.०१ वा. चन्द्रोदयातच ग्रहण सुरु होईल. सर्व ठिकाणी ७.२६ वा. ग्रहण संपेल. महाराष्ट्रात पूर्व प्रदेशात गडचिरोली येथे ७० टक्के तर पश्चिम प्रदेशात मुंबई येथे १५ टक्के ग्रहण दिसेल,  अशी माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वाच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.

भारतातून चंद्रोदयासोबतच ग्रहण लागलेले असेल

८ नोव्हेंबर २०२२ रोजी दिसणारे खंडग्रास चंद्रग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर-दक्षिण अमेरिका येथील काही भागांतून दिसेल. पूर्वेत्तर भारताचे टोक असलेल्या अरुणाचल प्रदेशात चंद्र उगविताना खग्रास स्थिती असेल परंतु चंद्र क्षितिजावर असल्याने पाहता येणार नाही. उर्वरित देशात सर्वत्र हे ग्रहण खंडग्रास दिसेल. भारतीय वेळेनुसार ८ तारखेला भारतीय वेळेनुसार दुपारी १.३२ वा. छायाकल्प चंद्र ग्रहणाला सुरुवात होईल. २.३९ वा. खंडग्रास ग्रहणाला सुरुवात होईल, ३.४६ वा. खग्रास ग्रहणाला सुरुवात होईल, तर ५.११ मिनिटाने खग्रास ग्रहण समाप्त होईल. ६.१९ वा. खंडग्रास ग्रहण समाप्त, तर ७.२६ वा. छायाकल्प चंद्रग्रहण समाप्त होईल. ग्रहणाचा छायाकल्प काळ ०२.१४ तास, खंडग्रास काळ ०२.१५ तास,  खग्रास काळ ०१.२५ तास तर एकूण ग्रहणाचा काळ ०५.५४ तास असेल. भारतातून चंद्रोदयासोबतच ग्रहण लागलेले असेल आणि ०७.२६ वा. ग्रहण संपेल. पूर्व भारतात मोठे ग्रहण दिसेल तर पूर्व-पश्चिम रेखांशानुसार ग्रहण (ग्रस्तोदित भाग) लहान होत जाईल.

(हेही वाचा कोल्हापुरात लव्ह जिहाद! वातावरण तणावग्रस्त, हिंदुत्वादी संघटना उतरल्या रस्त्यावर)

२०२३ मध्ये एकूण ४ ग्रहणे होणार 

सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी सरळ रेषेत आली असता चंद्रग्रहण होत असते, यात पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. गडद छायेत पूर्ण चंद्र आल्यास खग्रास, काही भाग आल्यास खंडग्रास तर उप छायेत चंद्र आल्यास छायाकल्प चंद्रग्रहण होते. दरवर्षी दोन तरी चंद्र ग्रहणे होतात. २०२३ मध्ये एकूण ४ ग्रहणे होणार आहेत, त्यात २०/४/२०२३ रोजी खग्रास सूर्यग्रहण, ५/६ मे २०२३ रोजी छायाकल्प चंद्रग्रहण, १४/१०/२३ रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण आणि शेवटी २८,२९ ऑक्टोबर २०२३ रोजी खंडग्रास चंद्रग्रहनांचा समावेश आहे. पृथ्वीवरची दररोजची रात्र हा सुद्धा एक सावलीचाच प्रकार असून अशी ग्रहणे सूर्यमालेत सतत होत असतात.

महाराष्ट्रातील ग्रहनाच्या वेळा

चंद्रपूर येथे ०५.३३ वाजता, नागपूर येथे ०५.३२ वाजता, यवतमाळ येथे ०५.३७ वा., अकोला येथे ०५.४१ वा., जळगाव येथे ०५.४६ वा., औरंगाबाद येथे ०५.५० वा., नाशिक येथे ०५.५५ वा., पुणे येथे ०५.५७ वा., मुंबई येथे ग्रहण ०६.०१ वाजता सुरु होऊन ०७.२६ वा ग्रहण संपेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.