काही दिवसांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताच्या त्रासामुळे १४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेला जबाबदार धरत संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीच्या सुनावणीस मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. आता या याचिकेवर ८ जूनला सुनावणी होणार आहे. (Kharghar Heatstroke Deaths)
[Heatstroke deaths]
PIL seeking criminal prosecution of Maha CM Eknath Shinde and Dy CM Devendra Fadnavis over deaths of 14 people during an award ceremony mentioned before ACJ's bench.
HC – June 8
— Live Law (@LiveLawIndia) April 27, 2023
‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर फौजदारी कारवाई करावी’ (Kharghar Heatstroke Deaths)
विरारच्या सामाजिक कार्यकर्त्या शैला कंठे यांनी वकील नितीन सातपुते यांच्यामार्फत उपरोक्त जनहित याचिका दाखल केली आहे. यात याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे, आप्पासाहेब धर्माधिकारी यांना नुकतेच खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात तीव्र उष्णतेचा त्रास झाल्याने १४ जणांचा (Kharghar Heatstroke Deaths) मृत्यू झाला. या घटनेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली. त्यावर आज, गुरुवारी सुनावणी झाली. मात्र न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. (Kharghar Heatstroke Deaths)
(हेही वाचा – उद्धव आणि आदित्य ठाकरेंचे कपडे टरा-टरा फाडेन; नितेश राणेंचा संजय राऊतांना इशारा)
याचिकेत पुढे म्हटले आहे की, राजकीय फायद्यासाठीच कडक उन्हात इतका भव्य कार्यक्रम करण्यात आला. तसेच कार्यक्रमावर झालेला खर्च आयोजकांकडून वसूल करण्यात यावा. (Kharghar Heatstroke Deaths)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community