- ऋजुता लुकतुके
किया सोनेट फेसलिफ्ट गाडीचं बुकिंग भारतात २५,००० रुपये भरून सुरूही झालं आहे. आणि आतापर्यंत या गाडीला चांगला प्रतिसादही मिळताना दिसतो आहे. मॅन्युअल गिअरबॉक्स असलेल्या या गाडीत कंपनीने तीन इंजिन पर्याय सध्या दिले आहेत. १ लीटर टर्बो पेट्रोल, १.२ लीटर पेट्रोल इंजिन आणि दीड लीटर डिझेल इंजिन असे हे पर्याय आहेत.
किया फेसलिफ्ट एका लीटरमागे साधारणपणे १८.८६ किमीचं मायलेज देतील असा दावा कंपनीने केला आहे. कंपनीच्या १.२ लीटर पेट्रोल इंजिनमध्ये ५ स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स असेल. तर टर्बो पेट्रोल गाडीत ६ स्पीड ऑटोट्रान्समिशन असलेला गिअरबॉक्स आहे.
(हेही वाचा – Shreyas Iyer : श्रेयस अय्यर मुंबईकडून रणजी करंडकाचा सामना खेळणार)
तर डिझेल इंजिन असलेल्या गाडीत ६ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स असून २२ किलोमीटरचं मायलेज ही गाडी देते.
In a world gone tame, #TheNewSonet will be soon here to set you free!
But before that, watch the next-gen experts laud #TheWildReborn
Tell us in the comment section below what excites you the most.
Book now.#KiaIndia #TheNewSonetPremiere #WildByDesign #MovementThatInspires
— Kia India (@KiaInd) January 9, 2024
किया सोनेट फेसलिफ्टमध्ये महत्त्वाचा बदल झालाय तो एडीएस तंत्रज्जानाच्या समावेशाचा. ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर एड्स सिस्टिम अशी ही प्रणाली असून चालकाला रहदारी, वाहतुकी नियम पाळणे आणि पार्किंग या गोष्टीत ही प्रणाली मदत करते.
(हेही वाचा – Ravindra Waikar : तब्बल १५ तास चालली वायकरांची चौकशी; १७ जानेवारीला हजर राहण्याची सूचना)
गाडीचं एक्सटिरिअर तरुणांना आकर्षक वाटेल अशा पद्धतीने बदलण्यात आलं आहे. तर इंटिरिअरमध्येही सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. आता फेसलिफ्टमध्ये व्हेंटिलेटेड सिट्स, वायरलेस चार्जर, एअर प्युरिफायर, ३६० अंशांचा पार्किंग कॅमेरा इलेक्ट्रिक सीट अशा सुविधा आहेत.
किया सोनेटची किंमत ८ लाखांपासून सुरू होत आहे. आणि या गाडीची स्पर्धा टाटा निक्सॉन, ह्युंदे व्हेन्यू, मारुती सुझुकी ब्रेझा या कारशी असणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community