२५ लाखांच्या खंडणीसाठी मुलाचे अपहरण करून हत्या

२५ लाखांच्या खंडणीसाठी १३ वर्षीय मुलाचे अपहरण करुन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकरण मिरा रोड येथे उघडकीस आला आहे. काशिमिरा पोलिसांनी याप्रकरणी २ आरोपींना अटक केली आहे.

मिरा रोड येथील शांती पार्क परिसरात ही महिला दोन मुलांसह राहते. रविवारी रात्री ती कामावर गेली. रात्री १२ च्या सुमारास तिचा मुलगा मयंक हा घरातून बेपत्ता झाला होता. याप्रकरणी काशिमिरा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवारी दुपारी मयंकचा मृतदेह वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला. चाकूने भोसकून त्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी काशिमिरा पोलिसांनी अफझल अन्सारी (२२) आणि इम्रान शेख (२४) या दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी हे मयत मुलाचे मित्र होते. पैशांच्या आमिषाने त्यांनी मयंकचे अपहरण करून खंडणीचा बनाव रचला होता. दरम्यान, मयंकला संशय आल्याने आरोपींनी त्याची हत्या केली आणि नंतर त्याच्याच फोनने खंडणी मागितली, असे पोलिसांनी सांगितले.

(हेही वाचा उदय सामंतांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून दगडफेक )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here