मुंबईत ‘सिरीयल किलर’ला अटक, दोन गुन्ह्यांची कबुली

डोक्यात दगड टाकून करीत होता हत्या

78

रस्त्यावर झोपणाऱ्याची हत्या करणाऱ्या २३ वर्षीय सिरीयल किलरला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईसह गोवा राज्यात दोघांची दगडाने ठेचून हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली असून त्याने याप्रकारचे आणखी गुन्हे केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

काय घडला प्रकार?

दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटी कबुतर खाना या ठिकाणी २१ जून रोजी ५५ वर्षाच्या इसमाच्या मृतदेह दा.भ. मार्ग पोलिसांना मिळून आला होता. मृत इसमाच्या डोक्यात दगडाने प्रहार करून हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली असता बाबूलनाथ येथे राहणारे गजानन पवार असे मृत इसमाचे नाव असल्याचे समोर आले.

पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून मातेकऱ्याचा शोध सुरू केला व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले एक संशयित इसम गिरगाव येथील फुटेज मध्ये आढळून आला, पोलिसांनी त्याचा माग काढण्यासाठी रेल्वे स्थानकातील फुटेज तपासले असता संशयित आरोपी हा वांद्रे रेल्वे स्थानकातून पश्चिमेच्या दिशेने बाहेर जात असल्याचे आढळून आले.
त्याचा शोध घेतला असता ३ जुलै रोजी संशीयत हा वांद्रे पाली हिल रोड या ठिकाणी आढळून आला.

(हेही वाचा -व्हिप झुगारणाऱ्या 14 आमदारांवर होणार कारवाई, आदित्य ठाकरेंचे नाव मात्र वगळले)

पोलिसानी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचे नाव सूरज यादव (२३) असे त्याने सांगितले, पाली हिल रोड येथे राहून तो कचरा गोळा करण्याचे काम करतो त्यानेच गीरंगाव येथे एकाची हत्या केल्याची कबुली दिली, तसेच या प्रकारे गोवा राज्यात एकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.पोलिसांनी त्याला हत्येच्या गुन्हयात अटक करून गोवा पोलीसाकडे तेथील हत्येप्रकरणी खात्री करण्यात आली असता तो सांगत असलेली माहिती खरी असल्याचे कळले. सूरज याने आणखी काही हत्या केल्या आहेत याबाबत चौकशी करण्यात येत आहे. हत्या का केल्या याबाबत त्याने काहीही सांगितले तपास सुरू आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.