एटीएम (एनी टाईम मॅंगो) या हापूसच्या नव्या प्रजातीच्या झाडाची लागवड राजापूर तालुक्यातील जानशी येथील आंबा बागायतदार प्रशांत पटवर्धन यांनी वडील रामचंद्र शंकर पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या बागेमध्ये केली आहे. कातळ भागामध्ये माती टाकून विकसित केलेल्या बागेमध्ये सुमारे अडीच वर्षांच्या या झाडाला उन्हाळा आणि पावसाळा अशी वर्षातून दोनवेळा फळे लागतात.
या दोन टप्प्यांत तयार होतो आंबा
वैशिष्ट्यपूर्ण असलेले एटीएम हे झाड एका खासगी नर्सरीमधून विकत घेण्यात आले असून, लागवडीनंतरच्या तिस-या महिन्यामध्ये त्याला मोहोर आल्याचे पटवर्धन यांनी यावेळी माहिती देताना सांगतिले. दिवाळीनंतर मोहोर येऊन फळ लागले असून, ती फळे फेब्रुवारीमध्ये संपली. तर साधारणत: एप्रिल महिन्यात पुन्हा मोहर येऊन जुलैदरम्यान आंबा तयार होत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
( हेही वाचा: आता सगळे पासवर्ड लक्षात ठेवायची गरज नाही; गुगल, अॅपल आणि मायक्रोसाॅफ्ट कंपनीची मोठी घोषणा )
एटीएम आंब्याची वैशिष्ट्ये
- परागीकरणाला फायदेशीर ठरणा-या झाडांची लागवड.
- अडीच वर्षांचे झाड तीन फुटांचे.
- उंची किती वाढणार याबाबत उत्सुकता.
- हापूसची संकरित प्रजाती.
- फेब्रुवारी आणि जुलैमध्ये आंबा.
- फुलो-यात स्त्रीकेसरचे प्रमाण जास्त.
- चव ‘रायवळ’ सारखी.