मुंबापुरीत घर घेणा-यांसाठी आनंदाची बातमी!

132

मुंबईसारख्या स्वप्ननगरीत घर घेणं, अनेकांच स्वप्न असतं. आता अशा अनेक लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. नुकताच, नाइट फ्रॅंक इंडिया या संस्थेने 2021 च्या तिस-या तिमाहीचा ग्लोबल रेसिडेन्शिअल सिटीज इंडेक्सचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, यंदा मुंबईतील घरांच्या किंमतीत 1.8 टक्क्यांची घसरण झाली आहे. भारतातील इतर शहरांमध्ये मात्र घरांच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबापुरीत स्वत:चे घर घेणे आता शक्य झाले आहे.

जगभरातील शहरांच्या किंमतीतील वाढ आणि घट

यावर्षी जगभरातील 93 टक्के शहरांमधील घरांच्या किमती वाढल्या आहेत. यातील 44 टक्के शहरांनी वर्षभरात दोन अंकी दरवाढ नोंदवली. जागतिक क्रमवारीत तुर्कीच्या इझमीर शहराच्या घरांमध्ये यंदा तब्बल 34.8 टक्के एवढी सर्वोच्च वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यानंतर न्यूझिलंमधील वेलिंग्टन शहरात 33.5 टक्के वाढ झाली आहे. तर जागतिक क्रमवारीत मलेशियामधील क्वालालंपूर शहरातील घरांच्या किमतीत 5.7 टक्के एवढी सर्वात जास्त घट झाली आहे.

( हेही वाचा २०२१ : राजकीय शह-काटशहचे वर्ष )

भारतातील शहरांमध्ये घरांच्या किमतीत झालेली वाढ

  • हैदराबाद 2.5 टक्के
  • चेन्नई 2.2 टक्के
  • कोलकाता 1.5 टक्के
  • अहमदाबाद 0.4 टक्के
  • बंगळुरु 0.2 टक्के
  • दिल्ली 0.7 टक्के
  • पुणे 1.5 टक्के
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.