कार्ल सेगन हा खरंतर अंतराळ वेडा होता. कार्ल सेगन म्हणजे महान खगोलशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ. त्यांनी खगोलशास्त्र, खगोल भौतिकी आणि खगोल रसायनसास्त्राला लोकप्रिक बनवलं. त्यांनी सेटी नामक संस्था स्थापन केली होती. ही संस्था पृथ्वीवरुनच इतर ब्रह्मांडामधील जीवनाचा शोध लावते. (Dr. Carl Sagan)
कार्ल सेगन यांचा जन्म न्यूयॉर्कमधील बेन्सॉनहर्स्ट येथे ९ नोव्हेंबर १९३४ रोजी झाला. त्यांची आई राचेल ग्रबर ही गृहिणी होती आणि बाबा सॅम्युअल सेगन हे वस्त्र कामगार होते. कार्ल सेगन यांना लहानपणापासूनच खगोलशास्त्र आणि जीवशास्त्र यामध्ये रुची होती. त्यांनी शिकागो विद्यापठातून पदवी प्राप्त केली. पुढील सबंध आयुष्य त्यांनी संशोधन करण्यासाठी समर्पित केलं. स्टॅनली मिलर, जोशुआ लेडरबर्ग यासारख्या दिग्गज जीव वैज्ञानिकांची त्यांना साथ लाभली आहे.
डॉ. सेगन यांनी सर्वप्रथम अंतराळातील परग्रही जीवांच्या शोधासाठी संदेश पाठवला. या संदेशांना ’व्होयाजर गोल्डन रेकॉर्ड’ आणि ’पाउअनीर प्लाक’ म्हणतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे नासाच्या ’अपोलो’ या चांद्र मोहीमेसाठी अंतराळवीरांना चंद्रावर जाता आले. त्यांची ’कॉसमॉस: अ पर्सनक वोयाज’ या टिव्ही मालिकेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यांच्यामुळे ब्रह्मांडातील बरीच माहिती सर्वसामान्य लोकांना कळू शकली.
(हेही वाचा : Jammu and kashmir : सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्या चकमकीत एक दहशतवादी ठार)
त्यांनी विज्ञानासंबंधी सुमारे २० पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत. आपल्या जीवनकालात डॉ. कार्ल सेगन यांनी ६०० पेक्षा अधिक वैज्ञानिक शोधपत्र आणि लोकप्रिय लेख लिहिले आहेत. त्यांच्या ’कँटक्ट’ या सायन्स फिक्शन कादंबरीवर आधारित चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. आण्विक युद्ध झाल्यानंतर येणार्या हिवाळ्यामुळे मानव नष्ट होऊ शकतो हे त्यांनी जगाला पटवून दिले, यास ’आण्विक हिवाळा’ असे म्हटले गेले.
त्यांनी विज्ञानात घडवून आणलेल्या क्रांतीसाठी आणि कामासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मात्र या अंतराळ वेड्याला दीर्घ आयुष्य लाभले नाही. २० डिसेंबर १९९६ रोजी आजारामुळे वयाच्या ६२ व्या वर्षी या अवलियाला हे जग सोडून जावे लागले. कदाचित हा पृत्वीवासी अंतराळ वेडा खरोखरच अंतराळात राहायला गेला असावा.
Join Our WhatsApp Community