पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय या कट्टरपंथीय संस्थेची स्थापना २००६ साली झाली. सध्या या संस्थेला इतके महत्व प्राप्त झाले आहे कि, मुस्लीम धर्मीयांमधील विविध संस्थांमध्ये या संस्थेला अग्रस्थान प्राप्त झाले आहे. अर्थात या संस्थेचे मूळ असलेली संस्था नॅशनल डेव्हलपमेंट फंड (एनडीएफ) ची स्थापना १९९३ साली झाली होती. हळूहळू या संस्थेच्या विविध राज्यांत निरनिराळ्या नावाने छोट्या – मोठ्या संस्था स्थापन झाल्या. आज या संस्था विविध आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. याकरता नियमित स्वरूपात प्रशिक्षण दिले जाते, त्यातून नवनवीन नेतृत्व विकसित केले जाते. त्यामाध्यमातून जन आंदोलनाच्या साहाय्याने समाजावर प्रभाव टाकण्याचे सुनियोजित काम केले जात आहे.
(हेही वाचा : शिखांना भडकवण्याचं ‘इस्लामी’ कारस्थान… कोण आहे यामागचं पाकिस्तानी ‘प्यादं’?)
विविध राज्यांत कार्यरत ‘या’ आहेत संस्था!
- नॅशनल डेव्हलपमेंट फंड (एनडीएफ) – केरळ
- मनीथा नीथी पसराई (एमएनपी ) – तामिळनाडू
- कर्नाटक फोरम ऑफ डिग्निटी (केएफडी) – कर्नाटक
- सिटिझन्स फोरम – गोवा
- कम्युनिटी सोशल एज्युकेशन सोसायटी – राजस्थान
- नागरिक अधिकार सुरक्षा समिती – पश्चिम बंगाल
- लियांग सोशल फोरम – मणिपूर
- असोसिएशन फॉर सोशल जस्टीस – आंध्र प्रदेश
- मुस्लिम स्टुडंट फेडरेशन
CONSPIRACY AFOOT TO REPEAT MUZAFFARNAGAR OF 2013 AT NOOR PUR#noorpur pic.twitter.com/Tko2Hmx0ev
— SDPI (@sdpofindia) June 10, 2021
(हेही वाचा :ऑपरेशन ब्लू स्टारवरुन पंजाब विरोधात खलिस्तानी आतंकवाद्यांचे ‘हे’ नवे षडयंत्र)
‘जय भीम, जय मीम’चा नारा
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचे २१ जून २००९ रोजी खऱ्या अर्थाने राजकीय स्वरूपात बस्तान बसले. त्यासाठी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या नावाने संघटना स्थापना करण्यात आली. पीडित, वंचित वर्गाचा विकास आणि अधिकारासाठी लढण्याचे मुख्य उद्दिष्ट्य या संघटनेला नेमून देण्यात आले. ज्यामध्ये मुस्लीम, दलित, मागास जाती जमाती, आदिवासी यांना संघटित करण्याची जबाबदारी या संस्थेवर सोपवण्यात आली. अर्थात ‘जय भीम, जय मीम’ असा नारा या संस्थेला देण्यात आला आहे. या संस्थेला आता विद्यार्थी संघटना म्हणूनही स्थापित करण्याचा जोरदार प्रयत्न सुरु झाला आहे. ज्यामुळे याची पाळेमुळे आणखी खोलवर रुजली जातील, असा यामागील हेतू आहे.
Join Our WhatsApp Community