अफलातून भारतीय फुटबॉलपटू Sunil Chhetri यांच्या जीवन प्रवासाबद्दल जाणून घ्या

149
अफलातून भारतीय फुटबॉलपटू Sunil Chhetri यांच्या जीवन प्रवासाबद्दल जाणून घ्या
अफलातून भारतीय फुटबॉलपटू Sunil Chhetri यांच्या जीवन प्रवासाबद्दल जाणून घ्या

सुनील छेत्री (Sunil Chhetri) याचा जन्म ३ ऑगस्ट १९८४ साली आंध्रप्रदेशातल्या सिकंदराबाद येथे झाला. सध्या सिकंदराबाद हा तेलंगणाचा भाग आहे. सुनील छेत्री हा एक भारतीय प्रोफेशनल फुटबॉलपटू आहे. सध्या तो बंगळुरू इथल्या इंडियन सुपर लीग क्लबसाठी फॉरवर्ड म्हणून खेळतो. सुनील छेत्री हा आपल्या लिंक-अप खेळासाठी, त्याची गोल करण्याची क्षमता आणि फुटबॉल कॅप्टनशिपसाठी प्रसिद्ध आहे. तो आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेमध्ये सर्वांत जास्त गोल करणारा चौथ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. तसेच सुनील छेत्री हा सर्वात जास्त फुटबॉल मॅच खेळणारा खेळाडू आणि भारततीय नॅशनल फुटबॉल टीमचा आतापर्यंत प्रत्येक वेळी सर्वोच्च गोल करणारा खेळाडूही आहे. सुनील छेत्री हा भारतातला ऑल टाईम बेस्ट फुटबॉलपटू म्हणून ओळखला जातो.

(हेही वाचा- ISRO : शुभांशुची आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी प्रमुख अंतराळवीर म्हणून निवड)

सुनील छेत्रीने (Sunil Chhetri) २००२ साली मोहन बागान येथून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. त्याने जेसीटी येथे ४८ सामन्यांमध्ये २१ गोल केले. तसंच दिल्लीत भरवण्यात आलेल्या संतोष ट्रॉफी ५९व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुनील छेत्री हा दिल्लीच्या संघाकडून खेळला होता. त्याने त्या स्पर्धेमध्ये गुजरातविरुद्ध हॅट्ट्रिकसकट सहा गोल केले होते. त्या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये केरळच्या संघाकडून दिल्ली संघाचा पराभव झाला होता. त्या सामन्यातही सुनील छेत्रीने आपल्या चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलं होतं. याव्यतिरिक्त सुनील छेत्री (Sunil Chhetri) हा चिराग युनायटेड आणि मोहन बागानसाठी खेळला. त्यानंतर तो प्रिमेरिया लीगाच्या स्पोर्टिंग सीपी येथे क्लबच्या राखीव बाजूसाठी खेळला.

२०१० साली त्याने कॅन्सास सिटी विझार्ड्स येथे भरवण्यात आलेल्या मेजर लीग सॉकर साईड स्पर्धेसाठी कॉन्ट्रॅक्ट साईन केला. सुनील छेत्री (Sunil Chhetri) हा परदेशात जाऊन खेळणारा उपखंडातला तिसरा खेळाडू ठरला. त्यानंतर तो भारताच्या आय-लीगमध्ये खेळण्यासाठी मायदेशी परतला.

(हेही वाचा- Ind vs SL, 1st ODI : भारत आणि श्रीलंकेची नाट्यपूर्ण बरोबरी )

सुनील छेत्रीने (Sunil Chhetri) भारताला २००७, २००९ आणि २०१२ साली नेहरू चषक तसंच २०११, २०१५, २०२१ आणि २०२३ साली सॅफ चॅम्पियनशिप जिंकून दिली. २००८ सालच्या AFC चॅलेंज कपमध्येही त्याने भारतीय फुटबॉल संघाला विजय मिळवून दिला. सुनील छेत्रीने २७ वर्षांमध्ये पहिल्यांदा AFC एशियन कपसाठी भारतीय संघाला पात्रता मिळवून दिली. २०११ मध्ये झालेल्या अंतिम स्पर्धेमध्ये त्याने दोनदा गोल केले. तसंच २०१६ साली सुनील छेत्रीने बंगळूरूच्या फुटबॉल संघाला AFC कपच्या स्पर्धेमध्ये रौप्य पदक जिंकून दिलं होतं.

सुनील छेत्रीला (Sunil Chhetri) २००७, २०११, २०१३, २०१४, २०१७, २०१८-१९ आणि २०२१-२२ या वर्षांमध्ये सात वेळा AIFF प्लेअर ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आलं होतं. याव्यतिरिक्त सुनील छेत्रीला २०११ साली क्रीडा क्षेत्रातल्या त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. तसंच २०१९ साली त्याला पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. याव्यतिरिक्त २०२१ साली सुनील छेत्रीला (Sunil Chhetri) भारतातला सर्वोच्च क्रीडा सन्मान मानला जाणारा खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार प्राप्त करणारा सुनील छेत्री हा पहिला फुटबॉलपटू होता.

(हेही वाचा- BSF Officers : गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय! वाढत्या दहशतवादी हल्ल्यांमुळे बीएसएफच्या महासंचालकांना पदावरून हटवलं)

सुनील छेत्रीने (Sunil Chhetri) २०२४ सालच्या जून महिन्यात भारत विरुद्ध कुवैत हा शेवटचा सामना खेळला. त्यानंतर त्याने फुटबॉलच्या सर्व प्रकारच्या स्पर्धांमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.