रेल्वे ही भारताची जीवनवाहिनी आहे. रोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे नसेल तर सर्वसामान्य लोकांना एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाण्यात अडचण निर्माण होईल. भारतीय रेल्वे जगातले चौथे सर्वात मोठे नेटवर्क आहे. यावरुन आपल्या रेल्वेची महती कळते.
या रेल्वेबाबत अनेक कथा, गंमतीजमती सुद्धा आहेत. देशातला सर्वात कमी अक्षराचे रेल्वे स्टेशन होण्याचा मान कोणत्या स्टेशनला मिळाला आहे हे माहिती आहे का तुम्हाला? भारतीय रेल्वेमध्ये हे एकच रेल्वे स्टेशन सर्वात लहान अक्षराचे आहे. या रेल्वे स्टेशनचे नाव आपल्या सहज लक्षात राहते.
गंमत म्हणजे केवळ दोन अक्षरांचे असलेले हे नाव ऐकताना अथवा वाचतानाही विचित्र आणि गंमतीदार वाटते. या रेल्वे स्टेशनचे नाव आहे ’ईब’. इंग्रजी आपण Ib लिहू शकतो. हे नाव कधी सुरू होते आणि कधी संपते तेच कळत नाही. ईब या नदीवरुन या रेल्वे स्टेशनचे नाव पडले असे स्थानिक लोकांकडून कळते.
ईब ही नदी छत्तीसगड आणि ओडिसा राज्यातून वाहते. छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यातील पंड्रापाठ गावाच्या जवळील पर्वतावर या नदीचा उगम झाला आणि ही नदी छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातून आणि ओडिसातील झारसुगुडा तसेच सुंदरगड जिल्ह्यातून वाहते. या नदीवरुन हे इतके छोटे नाव या रेल्वे स्टेशनला पडले आहे. आपल्या भारतीय रेल्वेच्या आणखी अनेक गंमतीजमती आहेत.
(हेही वाचा – या गावाला रस्तेच नाहीत, फक्त पाणीच पाणी)
Join Our WhatsApp Community