जानेवारी महिन्यात तुम्ही बॅंकेशी संबंधीत कामासाठी बॅंकेत जाणार असाल, तर प्रथम या महिन्यातील बॅंकांच्या सुट्ट्यांची ही यादी नक्की बघा. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी 2022 मध्ये बॅंक सुट्ट्यांची यादी जारी केली होती. या यादीनुसार जानेवारी 2022 या महिन्यात बॅंका तब्बल 16 दिवस बंद राहणार आहेत. या क्रमाने या आठवड्यात 5 दिवस बॅंका बंद असतील.
जानेवारी 2022 मध्ये 16 दिवस बॅंकाना सुट्ट्या आहेत. यातील 4 रविवार, तर रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुस-या आणि चौथ्या शनिवारी बॅंका बंद राहणार आहेत. जानेवारी या संपूर्ण महिन्याचं बोलायचं झालं तर, संपूर्ण देशातील विविध राज्यांत जानेवारी महिन्यात 16 दिवस बॅंका बंद राहणार आहेत.
या आठवड्यात बँका चार दिवस बंद राहणार
- 11 जानेवारी 2022: (आयझॉलमधील मिशनरी दिनानिमित्त बँका बंद राहतील)
- 12 जानेवारी, 2022: (स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त कोलकातामध्ये बँका बंद राहतील)
- 14 जानेवारी, 2022: (अहमदाबाद आणि चेन्नईमध्ये मकर संक्रांती/पोंगल रोजी बँका बंद राहतील)
- 15 जानेवारी, 2022: (बंगळुरू, चेन्नई, गंगटोक आणि हैदराबादमध्ये उत्तरायण पुण्यकाल मकर संक्रांती उत्सव/ माघे संक्रांती/ संक्रांती/ पोंगल/ तिरुवल्लुवर दिवसांना बँका बंद राहतील)
( हेही वाचा: ‘या’ कारणांमुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी होणार! )
सुट्ट्यांची यादी –
- ११ जानेवारी मिशनरी डे ( मिझोराम)
- १२ जानेवारी स्वामी विवेकानंद जयंतीची सुट्टी असेल
- १४ जानेवारी मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक राज्यांमध्ये सुट्टी असेल.
- १५ जानेवारी आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी, तामिळनाडूमध्ये , रोजी सुट्टी असेल
- १६ जानेवारी रविवारी देशभरात साप्ताहिक सुट्टी
- १७ जानेवारी थाई पूसम (चेन्नई)
- २२ जानेवारी शनिवार महिन्याचा चौथा शनिवार
- २३ जानेवारी रविवार नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती, देशभरात आठवडा सुट्टी
- २५ जानेवारी राज्य स्थापना दिवस (हिमाचल प्रदेश)
- २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाची देशभरात सुट्टी असेल
- ३१ जानेवारी आसाममध्ये सुट्टी असेल