जयंत गोकलदास गडित यांचे गुजराती साहित्य क्षेत्रात मोठे योगदान होते. ते गुजराती कादंबरीकार, समीक्षक आणि प्राध्यापक होते. गडित यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९३८ रोजी मुंबईतील कांदिवली येथे झाला. गोकलदास गडित आणि संतोक हे त्यांचे आई-वडील. त्यांनी गुजरात विद्यापीठात गुजराती आणि संस्कृतचा अभ्यास केला आणि १९६१ मध्ये कला शाखेची पदवी घेतली. तसेच १९६४ मध्ये मास्टर ऑफ आर्ट्सची पदवी प्राप्त केली. (Jayant Gadit)
पुढे १९७४ मध्ये त्यांनी हरिवल्लभ भयानी यांच्या नेतृत्वाखाली पीएचडी प्राप्त केली. गडित यांनी १९६५ ते १९७७ या काळात पेटलाड आणि महुधा येथील कला महाविद्यालयात अध्यापन केले. १९७७ ते १९८६ या काळात त्यांनी सरदार पटेल विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागात प्राध्यापक म्हणून काम केले आणि वयाच्या ६० व्या वर्षी निवृत्त होण्यापूर्वी गुजराती विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले. (Jayant Gadit)
(हेही वाचा : Sanjay Shirsat : ३१ डिसेंबरनंतर मविआतील मोठे नेते महायुतीत येतील – संजय शिरसाट यांचा दावा)
जयंत गडित यांनी १९६९ रोजी लिहिलेल्या ‘अव्रुत’ या कादंबरीद्वारे आपल्या साहित्यिक कारकिर्दीची सुरुवात केली. या कादंबरीचा विषय होता शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचार. त्यांनी १९७९ मध्ये चस्पाक्षी अने कर्ण नावाच्या एका खंडात दोन कादंबऱ्या प्रकाशित केल्या. बदलती क्षितिज हे त्यांचे पुस्तक १९८६ मध्ये प्रकाशित झाले. हे पुस्तक आरक्षणविरोधी निदर्शनांनंतर भडकलेल्या दंगलीवर आधारित होते. तसेच त्यांनी इतर अनेक साहित्य रचना केली आहे.त्यांना २००८ मध्ये धनजी कांजी गांधी सुवर्ण चंद्रक मिळाले आणि त्यांना दोनदा गुजरात साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. त्यांनी दिलेले गुजराती साहित्यातील योगदान गुजराती जनता कधीच विसरणार नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community