New Phone Launch : जाणून घ्या iQOO Neo 8 ची भारतातील लाँचिंगची तारीख, फिचर्स आणि किंमत

iQOO या ही चिनी मोबाईल कंपनी सध्या वेगाने वाटचाल करत आहे.

171
New Phone Launch : जाणून घ्या iQOO Neo 8 ची भारतातील लाँचिंगची तारीख, फिचर्स आणि किंमत
New Phone Launch : जाणून घ्या iQOO Neo 8 ची भारतातील लाँचिंगची तारीख, फिचर्स आणि किंमत
  • ऋजुता लुकतुके

iQOO निओ ८ सीरिज पुढील महिन्यात लाँच होतेय. कंपनीने नवीन दोन फोन कसे आहेत, फिचर्स काय आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे किंमत किती असेल जाणून घेऊया… (iQOO Neo 8)

iQOO या ही चिनी मोबाईल कंपनी सध्या वेगाने वाटचाल करत आहे. मे महिन्यात चीनमध्ये लाँच झालेल्या कंपनीच्या निओ सीरिजमधील आठव्या पिढीतले फोन १ टेराबाईट साठवणूक क्षमतेचे आहेत. हा एक प्रकारे मोबाईआल फोन क्षेत्रातला विक्रम आहे. त्यामुळे कंपनीच्या फोनची चर्चा नेहमीच असते.

आताही नवरात्री आणि दिवाळी दरम्यान कंपनीच्या सर्वच फोन मॉडेलवर ॲमेझॉन सेल अंतर्गत कंपनीने जास्तीत जास्त २७,००० रुपयांची सूट देऊ केल्यामुळे कंपनी चर्चेत आहे. कंपनीसाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपले निओ फोन कंपनी नोव्हेंबर महिन्यात चीनच्या बाहेरच्या बाजारपेठांमध्ये लाँच करणार आहे.

भारतातही iQOO निओ ८ हे फोन १६ नोव्हेंरला लाँच होतील अशी अपेक्षा आहे. चीन बाहेरही 1TB साठवणूक क्षमतेचे फोन कंपनी लाँच करते का याची उत्सुकता तर आहेच. शिवाय पहिल्यांदाच कंपनी प्रो प्रकारातील फोन आणणार असल्यामुळे त्याच्या फिचर्सचीही चर्चा आहे. (iQOO Neo 8)

(हेही वाचा – Mumbai BJP : मुंबई भाजपकडून वाघनखांच्या निमित्ताने “शंकेखोराचा कोथळा काढण्यासाठी” कार्यक्रम)

iQOO फोनचे फिचर्स

निओ ८ सीरिजचे दोन्ही फोन ६.६८ इंच डिस्प्ले असलेले असतील. आणि यात १२०० मेगाहर्टझ क्षमतेचा प्रोसेसर असेल. तर आठव्या पिढीतील प्रो फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी सह ९२०० प्लस चिप तसंच विवो वी१ इमेज प्रोसेसरही देण्यात येईल.

निओ ८ प्रोची बॅटरी क्षमता ५,००० एमएएच इतकी असेल. आणि चार्जरही १२० मेगावॅट क्षमतेचा असेल. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या जलद चार्जिंग फोनपैकी हा एक असेल. तर फोनचा मुख्य कॅमेराही ५० मेगापिक्सेल क्षमतेचा असेल. आणखी दोन सेकंडरी कॅमेरेही फोनमध्ये देण्यात येतील. सेल्फी कॅमेरा हा १६ मेगापिक्सल क्षमतेचा असेल.

प्राथमिक निओ ८ फोन १२८ तसंच २५६ जीबी साठवणूक क्षमतेचे असतील. आणि निओ ८ प्रो मध्ये चीन प्रमाणे १ टीबी इतकी क्षमता दिली जाते का याची उत्सुकता सगळ्यांना आहे.

iQOO निओ ८ प्रो फोनची किंमत ३७,००० रुपये इतकी असेल असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. (iQOO Neo 8)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.