अमेरिका, रशियासारख्या देशांचे अवकाश क्षेत्रात वर्चस्व होते. या क्षेत्रात भारताची प्रगतीही उल्लेखनीय होती. हळुहळू भारतही अवकाशातील एक मजबूत शक्ती म्हणून उदयास येऊ लागला होता. 26 मे 1999 मध्ये या दिवशी भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) भारत, जर्मनी आणि दक्षिण कोरियाचे तीन उपग्रह अवकाश कक्षेत यशस्वीरित्या सोडले आणि भारताने अंतराळ क्षेत्रात आपली प्रगती जगाला दाखवून दिली.
…म्हणून 26 मे हा दिवस भारताच्या इतिहासात महत्वाचा
- 1739: अफगाणिस्तान हा एकेकाळी भारताचा एक भाग होता, परंतु मुघल सम्राट मोहम्मद शाह याने इराणच्या नादिर शाह याच्याशी करार करून तो भारतीय साम्राज्यापासून वेगळा केला.
- 1957: जनता विमा पॉलिसी बॉम्बे (मुंबई) येथे सुरू करण्यात आली.
- 1999: इस्रोने भारत, जर्मनी आणि दक्षिण कोरियाचे तीन उपग्रह यशस्वीरित्या अंतराळ कक्षेत सोडले.
- 1999: सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात 318 धावांची विश्वविक्रमी भागीदारी केली.
- 2014: नरेंद्र मोदी यांनी भारताचे 15 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.