‘या’ अभिनेत्रीने लावला ‘वायफाय’चा शोध

112

स्त्रियांच्या हक्कांना एवढे महत्त्व नसलेल्या काळात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत एका स्त्रीने वायफायचा शोध लावला. beauty with brain याचे परफेक्ट उदाहरण म्हणता येईल, अशा स्त्रीने वायफायचा शोध लावला. 20व्या दशकात आपल्या सौंदर्याने घायाळ केलेल्या स्त्रीने आपल्या कर्तृत्वाचा ठसा कसा उमटवला हे पाहुया. हेडी लामार या हाॅलीवूडच्या अभिनेत्रीने वायफायचा शोध लावला आहे.

Wifi 1

हेडी लामार हिचा जन्म व्हिएन्नामध्ये 1914 साली झाला. तिचे जन्मगाव हेडगिव किजलर असे होते. एकुलती एक असलेली हेडगिव तिच्या वडिलांना खूप प्रिय होती. तिचे वडिल स्वत: एक उत्साही अभ्यासक होते. संध्याकाळी फिरण्यासाठी जात असताना, तिच्या वडिलांनी तिला अनेक छोट्या छोट्या यंत्रांची अंतर्गत माहिती दिली. या संवादामुळे हेडगिवला यंत्रांबद्दल आकर्षण निर्माण झाले. म्हणूनच की काय अगदी 5 वर्षांची असताना, ती घरातील खराब यंत्रांना दुरुस्त करत असे. तिची आई एक पियानिस्ट होती. आईनेच तिला कला, नाटक, चित्रपट यांची ओळख करुन दिली. आई- वडिलांचा हा वारसा तिने पुढे चालवला.

Wifi 2

 

1937 मध्ये एमजीएम या प्रसिद्ध सिनेमा स्टुडिओशी करारबद्ध झाल्यावर तिने अनेक सिनेमांमध्ये काम केले. या अभिनय कौशल्याबरोबरच लामारकडे अजून एक कौशल्य होते आणि ते म्हणजे संशोधन वृत्ती. आपल्या मोकळ्या वेळेत ती स्वत:ला संशोधन कार्यात मग्न ठेवत असे. बाॅम्बशेल या तिच्यावर आधारित जीवनपटात याबद्दल सांगताना ती म्हणते, मला संशोधनासाठी जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत, मला ते आपोआप जमते.

लामारला संशोधनात मदत केली ती हाॅवर्ड ह्युज याने. स्वत:ची विमान कंपनी असणा-या हाॅवर्ड ह्युजने लामारला एक छोटीशी यंत्रशाळाच सुरू करून दिली. त्याच दरम्यान अमेरिकन सैन्याला पुरवता येतील, अशी वेगवान विमाने बनवण्याचे आपले ध्येय त्याने लामारला बोलून दाखवले. लामारने मासे आणि पक्षांची पुस्तके वाचून काढली. त्यांच्या वेगाने पोहण्याच्या आणि उडण्याच्या तंत्राचा अभ्यास केला. यावर अवलंबून असलेली एक यंत्रणा बनवून ती ह्युजला दाखवली. पुढे ह्युजने याच तंत्राचा वापर करुन वेगवान जहाजे बनवली.

( हेही वाचा: तुमचाही स्मार्टफोन हरवलाय? ‘बेस्ट’ने जारी केली गहाळ झालेल्या फोनची यादी! )

लामारचा सगळ्यात मोठा शोध होता गु्प्त संवाद प्रणाली. फ्रीक्वेंसी हाॅपिंग या प्रणालीचा वापर करुन तिने हा शोध लावला. याच तंत्राचा वापर करुन अमेरिकन नौदलाचे दुस-या महायुद्धात मोठे यश मिळवले. आता याच प्रणालीचा वापर करुन आधुनिक वाय-फायचा शोध लागला आहे. 1942 मध्ये तिला तिच्या या शोधासाठी पेटंटही देण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.