कोणत्या इस्लामी देशांत कोणत्या कारणांसाठी आहे बुरखा, हिजाबवर बंदी? जाणून घ्या…

137

कर्नाटकातून उद्रेक झालेल्या हिजाब प्रकरणाचे पडसाद मागच्या काही दिवसांपासून भारताच्या अनेक भागांत दिसून येत आहेत. मुस्लिम समुदायाकडून ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का? जगातील अनेक मुस्लिम देशांमध्ये बुरखा आणि हिजाबवर बंदी घालण्यात आली आहे. म्हणजे एकीकडे अल्पसंख्यांक असलेला मुस्लिम समुदाय बुरखा आणि हिजाब घालण्याची मागणी करत आहे, तर दुसरीकडे मात्र मुस्लिम देशांनीच या बुरखा आणि हिजाबवर आधीच बंदी घातली आहे. या मुस्लिम देशांनी बुरखा आणि हिजाबवर बंदी का घातली ? याचं कारण वाचून तुम्ही थक्क व्हालं.

ट्युनिशिया
  • ट्युनिशिया या देशाने दहशतवादी हल्ल्यानंतर, संपूर्ण चेहरा झाकला जाईल, अशा बुरख्यावर बंदी घातली आहे. बुरख्यावर बंदी घालण्याआधी या देशातील विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करण्याआधी आपले ओळख प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक होते.

इराक

  • इराकमध्ये आता महिला हिजाब वा बुरख्याला परिधान करण्यास नकार देऊ शकतात. आधी इराकमध्ये मिलिशिया आणि अल कायदा या सदस्यांचे साम्राज्य होते, पण इराकमध्ये सुरक्षेत सुधारणा झाल्या आणि आता या कट्टरपंथीयांचे इराकमधील वर्चस्व कमी झाले. त्यामुळे आता इराकमधील महिलांना बुरखा वा हिजाब घालण्याची गरज नाही. त्या हिजाब वा डोकं झाकण्याला नकार देऊ शकतात.

सिरिया

  • आपल्या देशात धर्मनिरपेक्षता असावी यासाठी सिरिया या मुस्लिम देशाने विद्यापीठांत विद्यार्थ्यांना बुरखा वा हिजाब परिधान करण्यावर बंदी घातली आहे.

कझाकस्तान

  • कझाकस्तानमध्ये हिजाब घातलेल्या मुलांना शाळेत जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणा-या विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून, त्यांना तंबी दिली जात आहे. शाळेतील नियमांचा भंग करायाला भाग पाडणा-या 60 पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

( हेही वाचा : विक्रम संपथ यांच्याविरुद्ध डाव्यांचे षड्यंत्र…दिल्ली उच्च न्यायालयाने घेतली दखल)

इराक

  • बुरख्याचा वापर करुन आयएसआयने हल्ला करु नये, म्हणून इराकी सैन्याने मोसुलमध्ये रमजान बुरख्यावर बंदी घातली आहे.

अल्जेरिया

  • अल्जेरिया या मुस्लिम बहुल देशाने सार्वजनिक ठिकाणी काम करणा-या महिलांना संपूर्ण बुरखा परिधान करण्यावर बंदी घातली आहे.

इजिप्त

  • इजिप्तच्या उच्च प्रशासकीय न्यायालयाने नकाबवर बंदी घालण्याच्या कैरो विद्यापीठाच्या निर्णयाला मान्यता दिली आहे.

ताजिकिस्तान

  • मुस्लिम महिलांना हिजाब परिधान करण्यासाठी बंदी घालण्याचा ताजिकिस्तानने कायदा केला आहे. काही जण बुरखा घातल्यावर वेगळेपणाने बघतात त्यामुळे संशय निर्माण होतो. यासाठी बुरखा आणि हिजाबवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

(हेही वाचा कॉ. गोविंद पानसरे हत्याकांड : ७ वर्षे झाली तरीही तपास सुरूच! काय आहे गौडबंगाल?)

इंडोनेशिया

  • शाळेतील ख्रिश्चन मुलीला जबरदस्ती बुरखा परिधान करायला लावल्यामुळे, इंडोनेशियाने शाळेत बुरखा परिधान करुन येण्यावर बंदी घातली आहे.

मोरोक्को

  • मोरोक्को या देशाने बुरख्याच्या विक्रीवर, निर्मीतीवर आणि आयातीवर बंदी घातली आहे. सुरक्षेच्या कारणावरुन ही बंदी घालण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचा २००९च्या निवडणुकीसाठी कोणी भरकटवला मालेगाव बाँबस्फोटाचा तपास?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.