-
ऋजुता लुकतुके
सॅमसंग कंपनीचा फ्लॅगशिप एस सीरिजमधील नवीन फोन आजपासून (१७ जानेवारी) जगभरात लाँच होतोय आणि जगभरात या फोनविषयी उत्सुकता आहे. जागतिक स्तरावर होणाऱ्या गॅलेक्सी अनपॅक्ड या कार्यक्रमात सॅमसंग गॅलेक्सी व्हॅनिला एस२४, सॅमसंग गॅलेक्सी एस२४ प्लस आणि सॅमसंग गॅलेक्सी एस२४ अल्ट्रा असे सीरिजमधील ३ फोन जगात एकाच वेळी लाँच होतील. (Samsung Galaxy S24 Series)
पण, युरोपमध्ये या फोनचं डिझाईन आणि लुक आधीच लोकांसमोर एका लीक्ड व्हीडिओमधून आला आहे. या नवीन फोनच्या माध्यमातून सॅमसंग कंपनी आपला पहिला फ्लॅट स्क्रीन असलेला एमोल्ड डिस्प्ले फोन बाजारात आणत आहे. आणि या फोनची प्रखरता जास्तीत जास्त २५०० नीट्स इतकी असू शकते. (Samsung Galaxy S24 Series)
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : दर्शनानंतर घ्या मोफत जेवण, ‘या’ ठिकाणी थेट पोहचा)
दिसायला सॅमसंगची नवीन सीरिज ही एस२३ प्रमाणेच असेल. पण, एस२४ अल्ट्रा मॉडेलमध्ये फोनचं वजन कमी करण्यासाठी कंपनी टिटानियम धातू वापरत आहे. तर इतर दोन मॉडेल अजूनही ॲल्युमिनिअम फ्रेम असलेलीच असतील.
Who’s ready for a new era of mobile?! #SamsungUnpacked is going to be epic. Don’t miss out.
❤️ to follow along for a never-before-seen debut. pic.twitter.com/EImcAXmq6s
— Samsung Mobile (@SamsungMobile) January 2, 2024
या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ चा तिसऱ्या पिढीतील चिपसेट असेल. तर प्रोसेसर क्वालकॉम कंपनीचा आहे. तीनही मॉडेलची रॅम ८ जीबी ते जास्तीत जास्त १२ जीबी पर्यंत आहे. आणि फोनमधील स्टोरेजही १ टेराबाईटपर्यंत आहे. पण, १ टेराबाईटचा फोन हा लिमिटेड एडिशन असेल.
एस २३ फोन प्रमाणेच एस२४ मध्येही २०० मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा असेल. पण, त्याच्या झूम, टेलिफोटो आणि पेरिस्कोप लेन्समध्ये बरीच सुधारणा करण्यात आली आहे. सगळ्यात महागड्या अल्ट्रा फोनची किंमत १,३४,००० रुपयांच्या घरात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community