विक्रम संपथांच्या विरोधात प्रचार करणारी ऑड्रे ट्रुश्के आहे कोण? का करते भारताचा विरोध?

137

ऑड्रे ट्रुश्के भारत, हिंदुत्व आणि भारतातील राष्ट्रवादी विचारवंतांना का विरोध करत आहेत, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. याकरतारुत्जर्स युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकांचा डाव्या विचारांच्या संघटना आणि भारतात होत असलेल्या धर्मांतराशी काय संबंध आहे, हे शोधणे आवश्यक आहे.

ऑड्रे यांची अत्यंत मोठी वादग्रस्त पार्श्वभूमी आहे. हिंदूंना विरोध करणे, देवतांचा अपमान करणे, भारत सरकारच्या विरोधात खोटा प्रचार करणे आणि डाव्या विचारांचा प्रसार करणे हे त्यांचे जुने काम आहे. यासाठी अमेरिकेतील हिंदू संघटनांनीही अनेकदा यावर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने कोलंबियाच्या जिल्हा न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. ओसिंट नावाच्या वेबसाईटनुसार ऑड्रे ट्रुश्के यांचा भारतविरोधातील कट, हिंदुत्ववादी आणि राष्ट्रवादी इतिहासकारांची बदनामी करण्यामागे कारस्थान आहे.

ख्रिश्चन मिशनरी आणि धर्मांतरणाशी संबंध

  • ऑड्रे ट्रॅश्केचे सासरे नॅथन रेन हे भारतातील चर्च आणि धर्मांतराच्या कारस्थानाशी संबंधित आहेत.
  • नॅथन व्रेन हे कॅलिफोर्नियाच्या मॉन्टेरी येथील बॅप्टिस्ट चर्चमध्ये मुख्य पाद्री होते.
  • 2000 मध्ये ते भारतात आले. येथे त्यांनी स्वत:ची स्वयंसेवी संस्था (गैरसरकारी संस्था) स्थापन केली आणि त्याद्वारे धर्मांतराचे काम सुरू केले, असा त्यांच्यावर आरोप आहे.
  • 2008 मध्ये नॅथन रेनने BIMI (ब्लेस इंडिया मिनिस्ट्रीज इनकॉर्पोरेटेड) ची स्थापना केली, याचा उद्देश भारतात ख्रिश्चन समुदायाची संख्या वाढवणं आहे. (टू विन इंडिया फॉर क्राइस्ट).
  • नॅथन व्रेन यांच्या संस्थेने बीमीने ख्रिस्त द किंग ऑफ किंग्ज मिनिस्ट्रीज वेल्फेअर असोसिएशन (CKKMWA) ला भरपूर पैसे दिले. 2010 ते 2017 दरम्यान बीमीने चर्च बांधण्यासाठी आणि धर्मांतरणाच्या  कामासाठी सीकेकेएमडब्लूएला करोडो रुपये दिले.

(हेही वाचा विक्रम संपथ यांच्याविरुद्ध डाव्यांचे षडयंत्र…दिल्ली उच्च न्यायालयाने घेतली दखल)

पाकिस्तानशी संबंध

ऑड्रे ट्रॅश्केचे पती थेन रेन हे त्याचे वडील नॅथन रेन यांच्यासोबत भारतात राहतात. थेन रेन हा वडिलांच्या एनजीओसाठी काम करत होता. याशिवाय थेन रेन याने पाकिस्तान मानवाधिकार आयोगात इंटर्न म्हणून काम केले आहे. 2012-13 मध्ये ऑड्रे ट्रुश्केला अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ पाकिस्तान स्टडीज (AIPS) कडून फेलोशिप मिळाली. ही संघटना अमेरिकेत पाकिस्तानच्या हितसंबंधांचा प्रचार करते.

हिंदू देवतांचा अपमान

ऑड्रे ट्रुश्के कायम हिंदुत्ववादी विचार, भारताची राष्ट्रीय मूल्ये आणि राष्ट्रवादी विचारवंत आणि इतिहासकार यांच्या विरोधात सतत कट रचत असतात. याचा पुरावा म्हणजे तिचे ट्विटर हँडल! ज्याद्वारे ती ख्रिश्चन धर्माच्या प्रचाराचे काम करत आहे. तिने आपल्या ट्विटर हँडलवर भगवान राम आणि सीता यांच्याबद्दल अशोभनीय टिप्पणी केली आहे. हे ट्विट 20 एप्रिल 2018 चे होते.

Audrey Sita

याशिवाय त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून महाभारतातील द्रौपदीचा उल्लेख करताना कमेंटही शेअर केल्या आहेत.

Audery Draupadi

सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल द्वेष 

ऑड्रे ट्रॅश्के यांनी 10 जानेवारी 2020 रोजी एक ट्विट केले, ज्यात ती लिहिते, “भारत सरकारने 10 जानेवारी 2020 रोजी नागरिक सुधारणा कायदा जाहीर केला आहे.” हे उघडपणे भेदभाव करणारे विधेयक आहे, जे भारतातील अनेक मुस्लिमांचे नागरिकत्व काढून घेईल.

Audrey CAA

( हेही वाचा: Ahmedabad Bomb Blast: तब्बल 13 वर्षांनी न्यायालयानं दिला ‘हा’ महत्त्वपूर्ण निकाल )

…म्हणून आली बंधने

ऑड्रेचा दावा पूर्णपणे निराधार होता. भारत सरकारने पाकिस्तान, अफगाणिस्तान अशा मुस्लिम बहुल देशांमध्ये हिंदू, ख्रिश्चन, जैन आणि शीख अल्पसंख्याक लोकसंख्येवर अत्याचार करत आहेत. त्यामुळे भारताने सुधारित नागरिकत्व कायदा आणला आहे.  केंद्र सरकारने एफसीआरए कायदा लागू केल्यानंतर, भारतात पैसे पाठवून धर्मांतर करणे, तसेच चर्च बनवण्याचे ऑड्रे ट्रॅश्केचे सासरे आणि पतीचे काम थांबले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.