Bail Pola हा सण का साजरा केला जातो? काय आहे या सणाचे वैशिष्ट्य?

120
Bail Pola हा सण का साजरा केला जातो? काय आहे या सणाचे वैशिष्ट्य?

बैल हा बळीराजाचा जिवाभावाचा मित्र असतो. बळीराजा म्हणजे शेतकरी. शेतकऱ्यांना बैलाच्या मदतीने आपली शेतं नांगरता येतात. तसेच ग्रामीण भागात माल वाहून नेण्यासाठी किंवा प्रवासासाठी बैलाला बैलगाडीला जुंपलं जातं. बैलांच्या जीवावरच बळीराजा शेतीची सगळी कामं करतो आणि दळणवळणसुद्धा करतो. म्हणूनच बळीराजाच्या या मित्राला एक दिवस आराम मिळावा, त्याचं कोडकौतुक व्हावं यासाठी बैलपोळा हा सण साजरा केला जातो. (Bail Pola)

भारतात वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बैलपोळा हा सण साजरा केला जातो. या दिवशी बैलाला नांगराला किंवा गाडीला जुंपत नाहीत. हा दिवस बैलांचा आराम करण्याचा दिवस असतो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण म्हणजेच आवतण दिलं जातं. बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना स्वच्छ अंघोळ घालतात आणि कुरणावर चरायला नेतात. बैलांचं पोट व्यवस्थित भरलं की त्यांना घरी घेऊन येतात. (Bail Pola)

घरी आणल्यावर बैलांच्या खांद्याला म्हणजेच मान जिथे शरीराला जोडलेली असते त्या भागाला हळद आणि तुपाने किंवा तेलाने शेक देतात. त्याला ‘खांद शेकणं’ त्याला ‘खांड शेकणं’ असं म्हणतात. त्यानंतर बैलांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल म्हणजेच पाठीवर घालायची शाल पांघरतात, मग त्यांच्या अंगावर गेरूने ठिपके काढतात, त्यांच्या शिंगांना रंगवतात, बेगड लावतात, डोक्याला बाशिंग बांधतात, मग बैलांच्या गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा घातल्या जातात. (Bail Pola)

(हेही वाचा – gujiya : गुझियाला मराठीमध्ये काय म्हणतात? कधी केला जातो हा स्वादिष्ट पदार्थ?)

याला म्हणतात ‘बैलकरी’

तसंच त्यांना नवी वेसण, नवा कासरा म्हणजेच त्यांना आवरायची दोरी बांधतात. बैलांच्या पायात चांदीचे किंवा दोऱ्याचे तोडे घालतात. छान सजवून झालं की मग त्यांना पुरणपोळी आणि गोडाधोडाचा नैवेद्य खायला देतात. बैलाची निगा राखणाऱ्या घरगड्याला ‘बैलकरी’ असं म्हणतात. बैलपोळ्याच्या दिवशी या घरगड्यालाही नवीन कपडे देऊन त्याचा मानपान करण्यात येतो. (Bail Pola)

या दिवशी महाराष्ट्रातल्या खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचं तोरण बांधलं जातं. बैलपोळा या सणासाठी शेतकरी बांधवांमध्ये प्रचंड उत्साह असतो. आपला बैल इतर बैलांपेक्षा उठून दिसायाला हवा, यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे बैलांचा साजशृंगार खरेदी करतात आणि आपल्या बैलाला सुंदर सजवतात. मग बैलपोळ्याच्या मिरवणुकीत हिरिरीने भाग घेतात. (Bail Pola)

(हेही वाचा – badrinath : बद्रीनाथ मंदिराची संपूर्ण माहिती आता मराठीमध्ये, वाचा फक्त इथेच…)

याला म्हणतात पोळा फुटणे 

या दिवशी गावाच्या सीमेजवळच्या शेतावर आंब्याच्या पानांचं एक मोठं तोरण करून बांधण्यात येतं. त्या सीमेजवळ गावातल्या सगळ्या बैलजोड्या वाजंत्री, सनई, ढोल, ताशे यांच्या तालावर वाजवत एकत्र आणल्या जातात. मिरवणुकीच्या वेळेला ‘झडत्या’ म्हणजेच पोळ्याची गीतं म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर मग ‘मानवाईक’ व्यक्ती म्हणजे गावात ज्याला मोठा मान आहे अशी व्यक्ती ते शेतावर बांधलेलं आंब्याच्या पानांचं तोरण तोडतो. याला पोळा फुटला असं म्हणतात. (Bail Pola)

त्यानंतर बैलाला मारुतीच्या देवळात नेण्यात येतं. नंतर घरी नेऊन त्याना ओवाळलं जातं. मिरवणुकीत आणि त्यानंतर देवळात बैल नेणाऱ्या व्यक्तीला ‘बोजारा’ म्हणजे पैसे देण्यात येतात. शेतकरी बांधवांमध्ये बैलपोळा हा सण विशेष महत्त्वाचा मानला जातो म्हणून ते हा सण खूप उत्साहाने साजरा करतात. (Bail Pola)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.