दसऱ्याच्या पूर्वसंध्येला अर्थात खंडेनवमीला दादर, शिवाजी उद्यान येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात इस्त्रायलचे कॉन्सुल जनरल (महावाणिज्य दूत) कोबी शोशानी यांच्या हस्ते सोमवारी, 23 ऑक्टोबर रोजी शस्त्रपूजन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी स्मारकातील शस्त्रपूजन कार्यक्रमाविषयी त्यांच्या अधिकृत ‘X'(ट्विटर)द्वारे आपल्या भावना व्यक्त करून इस्त्रायल-हमास युद्धात इस्त्रायलचाच विजय होणार, याविषयी खात्री व्यक्त केली. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या ‘X’ला २४ तासांत सव्वादोन लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत तसेच ८ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.
‘X’वर कोबी शोशानी यांनी लिहिले आहे की, ‘यतो धर्मस्ततो जय: वाईटावर चांगल्याचा विजय मिळाल्याचे प्रतीक म्हणून ‘दसरा’ साजरा केला जातो. मुंबईतील @SavarkarSmarak येथे शस्त्रास्रांची पूजा केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकर या महान वीरांना श्रद्धांजली अर्पण केली. सध्या इस्त्रायल अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि आपल्या सर्वौच्च नैतिक मूल्यांसह हमासविरुद्ध लढत आहे. आम्ही जिंकू ‘ .
यतो धर्मस्ततो जयः Dussehra is the day to celebrate victory of good over evil. Worshiped weapons and offered tributes heros like Chhatrapati Shivaji Maharaj & Veer Savarkar at @SavarkarSmarak in Mumbai. Israel is fighting the war against Hamas with sophisticated weapons & a… pic.twitter.com/8Pms9ruChQ
— Kobbi Shoshani 🇮🇱 (@KobbiShoshani) October 23, 2023
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोबी शोशानी यांच्या पोस्टला प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ‘हे खरोखरच छान आहे. परंपरा स्वीकारणे आणि शस्त्रपूजनाने आमच्या रक्षकांना सन्मानित करणे- हा एक सुंदर विधी. जो धैर्य, धार्मिकता आणि संरक्षणाच्या भावनेचे प्रतीक आहे. आपण शांतता आणि सुरक्षिततेच्या रक्षकांना सलाम करूया, ज्यांचे समर्पण आणि बलिदान युगानुयुगे गुंजत आहे. ‘विजयादशमी’च्या तुम्हाला शुभेच्छा ! तसेच गणेशोत्सव, जन्माष्टमी या सणांमध्ये तुम्हाला सक्रीयपणे सहभागी होताना पाहून आनंद झाला.’
अनेकांनी या पोस्टवर प्रतिक्रिया देत इस्त्रायला युद्धात विजय मिळण्यासाठी पाठिंबा दर्शवला आहे, तर काहींनी ‘निःसंशयपणे, ‘दसरा’ हा वाईटावर चांगल्याच्या विजयाची एक शक्तिशाली आठवण असल्याचे म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकरांसारख्या आपल्या वीरांचा सन्मान करणे महत्त्वाचे आहे. इस्रायलमधील सध्याच्या परिस्थितीच्या संदर्भात, आम्ही सर्वजण शांतता आणि संघर्षांचे निराकरण करण्यासाठी आतूर आहोत, उज्ज्वल, अधिक शांततापूर्ण भविष्यासाठी प्रबळ आशा आहे, अशा स्वरुपाच्या अनेक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत.
Join Our WhatsApp Community