मुंबईत स्वतःचं हक्काचं घर असावं, असे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि हेच हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कोकण म्हाडाच्या घरांसाठी डिसेंबरमध्ये सोडत निघण्याची शक्यता आहे. ठाणे, विरारसह इतर भागातील ४ हजारांहून अधिक घरांसाठी डिसेंबर महिन्यात सोडत निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच परवडणाऱ्या दरात आपलं हक्काचं घर घेण्याचे स्वप्न तुमचंही पूर्ण होणार आहे.
दरम्यान, म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळामार्फत ठाणे, विरार इत्यादी भागात सोडतीच्या रूपात अधिकाधिक घरं उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोकण मंडळामार्फत डिसेंबरच्या अखेरपर्यंत साधारण चार हजारांहून अधिक घरांची सोडत काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर या सोडतीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
(हेही वाचा – रिक्षा प्रवास महागणार! 1 डिसेंबरपासून भाड्यात वाढ, मीटरप्रमाणेच भाडे आकारा RTO चे आदेश)
ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील घरांचा म्हाडाच्या कोकण मंडळाच्या आगामी सोडतीत समावेश असणार आहे. तर म्हाडाच्या कोकण मंडळाने १४ ऑक्टोबर २०२१ रोजी ८ हजारांहून अधिक घरांती सोडत काढली होती. या लॉटरीकरता दोन लाख ४६ हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले होते. म्हाडाच्या नियमांनुसार, विजेत्यांची पात्रता निश्चितीसाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विजेत्यांच्या ताब्यात घरे दिली जातात.
Join Our WhatsApp Community