कोल्हापुरचं अंबाबाई मंदिर (Kolhapur Mahalaxmi Temple) हे आदिशक्ती अंबामातेचं मंदिर आहे. आदिशक्तीच्या या सौम्य रुपाला महालक्ष्मी म्हणूनही ओळखलं जातं. हे मंदिर शिवपत्नी देवी अंबाबाईला समर्पित असलेलं शक्तीपीठ आहे. या मंदिरात आदिशक्ती माता महालक्ष्मी म्हणून वास करते. स्थानिक लोक तिची अंबाबाई म्हणूनच पूजा करतात.
अंबाबाईच्या मूर्तीचं वर्णन
कोल्हापूरच्या अंबाबाईचं मंदिर (Kolhapur Mahalaxmi Temple) कर्णदेवाने चालुक्य राजवटीत बांधलं होतं. या मंदिरात अंबाबाईची मूर्ती दगडी चबुतऱ्यावर उभी आहे. ही मूर्ती काळ्या दगडात कोरलेली आहे. मूर्तीची उंची तीन फूट एवढी आहे. अंबाबाईच्या मूर्तीचा मुकुट रत्नांनी सजवलेला आहे आणि मुकुटावर पाच फण्यांचा नाग कोरलेला आहे.
तसंच मूर्तीच्या मागे देवीचं वाहन म्हणून सिंहाचीही मूर्ती कोरलेली आहे. याव्यतिरिक्त मूर्तीच्या जवळ मातुलिंग फळ, गदा, ढाल आणि एक पाणपात्रदेखील आहे. अंबाबाईच्या मूर्तीचं वजन सुमारे ४० किलोग्रॅम एवढं आहे. तसंच मंदिरातल्या एका भिंतीवर श्रीयंत्र कोरलेलं आहे.
(हेही वाचा – Uday Samant यांचा मविआवर हल्लाबोल; म्हणाले, ‘लोकांची माथी भडकवण्याचा मविआचा डाव’)
अंबाबाई मंदिराचा इतिहास
हे मंदिर स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने ७व्या शतकामध्ये चालुक्य साम्राज्याच्या काळात बांधलं गेलं आहे. अनेक पुराणांमध्ये या मंदिराचा उल्लेख आढळतो. कोकणचा राजा कामदेव, चालुक्य, शिलाहार, देवगिरी राजघराण्यातील यादवांनी या शहराला भेट दिल्याचे पुरावे आहेत. तसंच आदि शंकराचार्यांनीही या मंदिराला भेट दिली होती.
कर्णदेवाने जंगल कापून हे मंदिर दृश्यास आणलं. इतिहासचक्र हे मंदिर महाजनपद काळापासूनचे असल्याचे सूचित करतं. आठव्या शतकात हे मंदिर भूकंपामुळे जमिनीखाली गेलं होतं असं म्हणतात. पुढे ९व्या शतकामध्ये गंडवादिक राजाने महाकाली मंदिर बांधून या अंबाबाईच्या मंदिराचा विस्तार केला.
११७८ ते १२०९ सालांदारम्यान, राजा जयसिंग आणि सिंधव यांच्या कारकिर्दीमध्ये, दक्षिण दरवाजा आणि अतिबळेश्वर मंदिर बांधलं गेलं. १२१८ मध्ये यादव राजा तोलुम याने महाद्वार बांधलं आणि देवीला दागिने अर्पण केले. याव्यतिरिक्त शिलाहारांनी महा सरस्वती मंदिरही बांधलं. याशिवाय चालुक्य काळात या मंदिराची स्थापना करण्यापूर्वी गणपती मंदिर बांधलं. १३व्या शतकामध्ये शंकराचार्यांनी नगर खाना आणि कार्यालय, तसंच दीपमाळही बांधली. (Kolhapur Mahalaxmi Temple)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community