करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शनिवारी, २८ जानेवारीपासून सात दिवसांच्या किरणोत्सवाला प्रारंभ झाला. मावळतीच्या सूर्यकिरणे करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या कमरेपर्यंत पोहोचली, यामुळे सात दिवस किरणोत्सव होण्याच्या सिध्दांताला बळ मिळाले आहे. सायंकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी सुरु झालेला हा प्रवास ६ वाजून १६ मिनिटांनी पूर्ण झाला.
असा झाला मनमोहक सोहळा
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात उत्तरायण कालखंडातील किरणोत्सव सोहळा शुक्रवारपासून सुरू झाला. शनिवारी, २८ जानेवारी रोजी दुसऱ्या दिवशी मावळतीची सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीच्या कमरेपर्यंत पूर्ण क्षमतेने पोहोचली. सायंकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी मावळतीची सूर्यकिरणे महाद्वार कमानीतून आत आली. त्यानंतर ५ वाजून ३८ मिनिटांनी गरुड मंडपातील चौथरा, ५ वाजून ४८ मिनिटांनी गणपती मंदिरातील जीना, ६ वाजून ०१ मिनिटांनी कासव चौक, ६ वाजून ०४ मिनिटांनी पितळी उंबरठा, ६ वाजून ०५ मिनिटांनी खजिना चौक असे टप्पे पूर्ण करत ६ वाजून १२ मिनिटांनी किरणांनी गाभाऱ्यात प्रवेश करुन चरणस्पर्श केला. तेथून पुढे ६ वाजून १५ ते १६ मिनिटांपर्यंत किरणे कमरेपर्यंत पोहोचून देवीच्या डाव्या बाजूला लुप्त झाली. पूर्वी वर्षातील दोन्ही किरणोत्सव सोहळे तीन दिवसांचे होते, नंतर पाच दिवसांचे झाले. आता सलग सात दिवस पूर्ण क्षमतेने किरणोत्सव होउ शकतो या सिध्दांताला शनिवारच्या निरिक्षणामुळे बळ मिळाले.
(हेही वाचा मिराज, सुखोई लढाऊ विमाने एकमेकांना धडकली; अपघात होण्यामागे काय आहेत कारणे?)
Join Our WhatsApp Community