कोकणातील बारसू, सोलगाव रिफायनरीला केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची मान्यता

कोकणातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यात आला होता यानंतर आता राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगाव येथे रिफायनरी प्रस्ताविक आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आता राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगावला केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.

( हेही वाचा : तब्बल ३६ तासांनी मुंबई-गोवा महामार्ग सुरू; अपघातग्रस्त टॅंकरमधील गॅस काढण्यात यश)

उद्योगमंत्री उदय सामंत व केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांमध्ये सकारात्मक चर्चा 

कोकणातील रिफायनरीबाबत उदय सामंत आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. शिवसेनेचे स्थानिक आमदार राजन साळवी हे रिफायनरी समर्थनार्थ आहेत. कोकणात ६० मिलियन मेट्रिक टन क्षमतेची रिफायनरी उभारणे शक्य आहे असे सांगण्यात येत आहे. बारसू आणि सोलगाव याभागात उभारली जाणारी रिफायनरी ही २० मिलियन मेट्रिक टन क्षमतेची आहे.

नाणार येथील रिफायनरीला स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केल्याने हा प्रकल्प रद्द करण्यात आला होता. यामुळे नव्या जागेची चाचपणी केली जात होती. यात राजापूर येथील बारसू आणि सोलगाव येथील जागांना मान्यता देण्यात आली आहे. नाणार रिफायनरीवरून मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले होते. मात्र, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबत सकारात्मकता दाखवल्याने बारसू सोलगावबाबत केंद्रीय मंत्री आणि सामंतांमध्ये चर्चा झाल्यावर आता पुरी यांनी या रिफायनरीला हिरवा कंदील दाखवला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here