उन्हाळी सुट्टी फुल्ल मजेत घालवायचीय? तर कोकणातील या 10 जागा आहेत बेस्ट

137

मागच्या दोन वर्षांत कोरोनामुळे उन्हाळी सुट्टी एन्जाॅय करता आली नाही, त्यामुळे यंदाच्या उन्हाळी सुट्ट्यांचा मनसोक्त आनंद लुटायचा असेल तर, कोकणातील या 10 जागा बेस्ट हाॅलिडे ठरतील. या जागा कोणत्या ते जाणून घेऊया.

अलिबाग

मुंबई, पुण्यात राहणा-या पैसेवाल्या लोकांचे शनिवारी-रविवारचे अलिबाग हे आवडते ठिकाण आहे. 17 व्या शतकात स्थापन झालेल्या या शहरात जुने किल्ले, चर्च, सभास्थाने आणि मंदिरे आहेत. मुंबईपासून अलिबाग हे अंतर सुमारे 100 किलोमीटर आहे.

काशिद

अलिबागपासून थोडे पुढे काशीद समुद्रकिनारा आहे. तो थोडा वेगळा आहे, पण त्याची लोकप्रियता वाढत आहे. या लांबच लांब समुद्रकिना-यावर कॅस्युरीना वृक्ष, स्नॅक स्टाॅल आणि हॅमक्स अशा वृक्षांच्या रांगा आहेत. मुंबईपासून काशिदचे अंतर सुमारे 130 किलोमीटर आहे.

( हेही वाचा: एका अपयशानंतर जन्माला आली ‘रॉ’! )

दिवेआगर

दिवेआगर हा फारसा प्रसिद्ध नसलेला समुद्रकिनारा आहे. खरंतर तो मुंबईपासून फारसा दूर नाही. पण तिथे जाण्यासाठीचा मार्ग घनदाट जंगलातून आहे. इथे एक्सोटिका बीच रिसाॅर्ट, नारळाच्या झुडपात इंद्रधनुष्य काॅटेड अशी हाॅटेल्स आहेत. मुंबईपासून दिवेआगरचे अंतर सुमारे 200 किलोमीटर आहे.

श्रीवर्धन

श्रीवर्धन समुद्रकिना-याचे वैशिष्ट्य म्हणजे बसण्यासाठी केलेली बाकडी, लाइट आणि सगळ्यात महात्त्वाचे म्हणजे स्वच्छ सार्वजनिक शौचालये जी भारतात समुद्र किनारी दुर्मिळ आहेत. मुंबईपासून श्रीवर्धनचे अंतर सुमारे 200 किलोमीटर आहे.

हरिहरेश्वर

बरेचसे लोक श्रीवर्धनमधील शंकराच्या देवस्थानाला भेट द्यायला येतात आणि मग तिकडे जवळच असलेल्या हरिहरेश्वरला जातात. समुद्रकिना-यालगतच प्रदक्षिणा मार्ग आहे. मुंबईपासून हरिहरेश्वरचे अंतर सुमारे 210 किलोमीटर आहे.

मुरुड

मुरुडचा समुद्र किनारा हा कोकणपट्टीवरील खूप मोठा समुद्र किनारा आहे. हाॅटेल आणि घरगुती राहण्याच्या सोई तिथे खूप आहेत. सगळ्यात महत्त्वाचे आकर्षण या किना-यावरचे म्हणजे डाॅल्फिन आहे. तिथे माशांची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. तिथूनच सुवर्णदुर्ग किल्ल्यालादेखील जाऊ शकता. हे ठिकाण पर्यटकाचं आवडते ठिकाण आहे. मुंबईपासून हे अंतर 240 किलोमीटर आहे.

गणपतीपुळे, मालगुंड

गणपतीपुळे समुद्र किनारा व गणपतीचे देऊळ प्रसिद्ध आहे. या बीचवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे शांत समु्द्रकिनारा हवा असेल, तर हा बीच उपयोगी नाही. तुम्हाला शांती हवी असेल, तर तिथूनच जवळ असणा-या मालगुंड बीचवर जा. मुंबईपासून हे अंतर सुमारे 340 किलोमीटर आहे.

तारकरली, मालवण आणि देवबाग

तळ कोकणातील म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे पर्यटकांचे विशेष आवडते ठिकाण आहे. याला घाटाचे सौंदर्यही पाहायला मिळते. ते अतिशय मनमोहक आहे. या बीचजवळ राहण्यासाठी खूप सुविधा आहेत. देवबाग येथे एक बेट तयार करुन तिथे वाॅटर स्पोर्ट आहेत. मुंबईपासूनचे अंतर 500 किलोमीटर आहे.

( हेही वाचा: राजद्रोहाचा पहिला गुन्हा कोणावर दाखल करण्यात आला होता माहित आहे का? )

भोगवे

भोगवेचा समुद्र किनारा तसा निर्जन भाग आहे. कार्ली नदी या अरबी समुद्राला मिळते. देवबाग बीचपासून म्हणजेच काही अंतरावरुनही हा बीच दिसून येतो, परंतु त्या परिसरातील तारकरलीच्या अतिप्रसिद्धीमुळे हा बीच दुर्लक्षित राहिला आहे.

वेंगुर्ला

गोव्यापासून अर्ध्या तासावर वेंगुर्ला बीच आहे. वेंगुर्ला समुद्रकिना-याला सभोवताली टेकड्या आहेत. लाइट हाऊस, जेटी म्हणजे जिथे मच्छीमार मोठ्या प्रमाणावर होते हा परिसर बर्न आयलॅंड म्हणूनही ओळखला जातो. मुंबईपासून याचे अंतर अंदाजे 520 किलोमीटर आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.