चाकरमान्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे कोकण रेल्वे. आता याच कोकण रेल्वेच्या बाबतीत मोठी बातमी समोर आली आहे. चाकरमान्यांच्या हक्काची ही कोकण रेल्वे आता विद्युत वेगाने धावणार आहे. कारण कोकण रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यावर या मार्गावरुन प्रवासी रेल्वे गाड्या धावणार आहेत. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण केले जाणार आहे.
पंतप्रधानांनी केले अभिनंदन
१०० टक्के विद्युतीकरण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोकण रेल्वेचे कौतुक करत अभिनंदन केले. ट्वीटरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ” मिशन १०० टक्के विद्युतीकरणाच्या उल्लेखनीय यशाबद्दल आणि शाश्वत विकासाचे नवीन मापदंड स्थापित केल्याबद्दल संपूर्ण कोकण रेल्वे च्या वृंदाचे अभिनंदन.”
Congratulations to the entire @KonkanRailway Team for the remarkable success of ‘Mission 100% Electrification’ and setting new benchmarks of sustainable development. https://t.co/NB0DAZIVNz
— Narendra Modi (@narendramodi) March 30, 2022
लवकरच विजेवर धावणार कोकण रेल्वे
सुरक्षा आयुक्तांकडून २२ आणि २४ मार्च रोजी तपासणी पूर्ण झाली असून, रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या अहवालाची कोकण रेल्वेला प्रतीक्षा आहे. या अहवालानंतर या मार्गावर विजेवर धावणाऱ्या रेल्वे गाड्या सुरू करण्यात येतील, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वे मंत्रालयाने २०१६ रोजी कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाला मंजुरी दिली होती. रत्नागिरी ते थिविम यादरम्यान विद्युतीकरण पूर्ण झाल्याने कोकण रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या ९७० किमी लांबीच्या रुळांवर विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. या विद्युतीकरणासाठी एकूण १ हजार २८७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
Join Our WhatsApp Community