मुंबई- गोवा महामार्गावरील परशुराम घाट ‘या’ कारणास्तव पुन्हा बंद?

79

मुंबई- गोवा महामार्गावरील परशुराम घाटात ( Parshuram Ghat) चौपदरीकरणासाठी माथ्यावरील डोंगर कटाईसर माती भरावाच्या कामासाठी घाटातील वाहतूक पुन्हा बंद करण्याचा विचार सुरु आहे. प्रशासन लवकरच याबाबत निर्णय घेईल, अशी शक्यता आहे. परंतु आता हा घाट पुन्हा बंद करण्याला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

घाट बंद केल्याने अनेक अडचणी

या वर्षाच्या उन्हाळ्यात आणि त्यानंतरच्या पावसाळ्यात परशुराम घाट बंद करण्यात आल्याने मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले होते. माथ्यावर असलेल्या नागरिकांची शेती खाली असल्याने आणि दैनंदिन व्यवहारही चिपळूणच्या (Chiplun) बाजारपेठेशी असल्याने सहाजिकच घाट बंद कालावधील त्यांना घरातच अडकून पडावे लागत होते. शिवाय शाळांनाही सुट्टी दिल्याने तसेच घाटाच्यावरील बाजूस लोटे एमआयडीसी असल्यामुळे चिपळूणमधून ये-जा करणा-यांची संख्या जास्त असल्याने त्यांनाही अडचणींना समोर जावे लागले होते. त्यामुळे यावेळी मात्र घाट बंद करण्यास परशुराम ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

( हेही वाचा: आता Zoom वर मेल, कॅलेंडरही पाहता येणार )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.