रवींद्र राजाराम केळेकर (Ravindra Kelekar) हे कोकणी साहित्यातील आधारस्तंभ होते. त्यांचा जन्म ७ मार्च १९२५ रोजी गोव्यात झाला. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना २००६ सालचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘आमची भास कोकणीच’ (AMCHI BHAS KONKANI), ‘बहुभाषिक भारतांत भासांचे समाजशास्त्र’ अशा प्रमुख ग्रंथांचे त्यांनी लेखन केले आहे. ते स्वातंत्र्यसैनिक आणि आधुनिक कोकणी चळवळीतील प्रणेते होते. तसेच ते एक प्रसिद्ध कोकणी विद्वान, भाषाशास्त्रज्ञ आणि सर्जनशील विचारवंत होते.
केळेकर हे भारतीय स्वातंत्र्य चळवळ, गोवा मुक्ती चळवळ आणि नंतर नव्याने स्थापन झालेल्या गोव्याच्या महाराष्ट्रात विलीनीकरणाविरुद्धच्या मोहिमेत सहभागी होते. कोंकणी भाषा मंडळाच्या (Konkani Bhasha Mandal) स्थापनेत त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांनी कोंकणीला मुख्य भाषा म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी आणि गोव्याची राज्यभाषा म्हणून पुनर्स्थापित करण्यासाठी साहित्यिक मोहिमेचे नेतृत्व केले.
त्यांनी कोंकणी भाषेत सुमारे १०० पुस्तके लिहिली, ज्यात आमची भास कोंकणीच, शालेंट कोंकणी कित्यक, बहू-भाषिक भारतांत भासेंचे समाजशास्त्र आणि हिमालयांत यांचा समावेश आहे. त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ जग मासिकाचे संपादन देखील केले. त्यांना पद्मभूषण, कला अकादमीचा गोमंत शारदा पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार आणि साहित्य अकादमी फेलोशिप अशा सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांना २००६ चा ज्ञानपीठ पुरस्कार देखील मिळाला. २७ ऑगस्ट २०१० रोजी त्यांना देवाज्ञा झाली. (Ravindra Kelekar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community