कोथामंगलम सुब्बू (Kothamangalam Subbu) यांचा जन्म १० नोव्हेंबर १९१० रोजी मद्रास येथे झाला. ते तमिळनाडू येथील सुप्रसिद्ध कवी, गीतकार, लेखक, अभिनेता आणि चित्रपट दिग्दर्शक होते. त्यांनी ’थिल्लाना मोहनम्बल’ नावाची तामिळ कादंबरी लिहिली. त्यांना पद्म पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते.
Kothamangalam Subbu यांनी अव्वैयर या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट त्या काळी एपिक मानला गेला. या चित्रपाटात त्या काळातील महान कलाकार श्रीमती के.बी. सुंदरंबल यांनी मुख्य भूमिका साकारली होती. अशोकमित्रन यांनी जेमिनी स्टुडिओमध्ये हा चित्रपट कसा आकाराला आला याचे विनोदी वर्णन केले होते.
सुब्बू, त्याची पत्नी सुंदरी बाई सोबत, एका वाईट बाईच्या नवर्याची भूमिका साकारली होती, जी जेवण देण्यात नकार देते. सुब्बू यांनी कन्नम्मा एन कधलीचे दिग्दर्शनही केले होते, ज्यात त्यांची पत्नी सुंदरीबाई यांनी भूमिका केली होती. त्याशिवाय, त्यांनी मिस मालिनीमध्ये नायक म्हणून काम केले होते. हा हिंदीमध्ये मिस्टर संपत म्हणून रिमेक झाला होता.
मिस मालिनी हा चित्रपट आरके नारायण यांच्या मिस्टर संपत या कादंबरीवर आधारित होता. दासी अपरंजी या चित्रपटात देखील या नवरा-बायकोने भूमिका केली होती. तसेच त्यांनी काही इतर तामिळ चित्रपटात देखील भूमिका साकारल्या होत्या. त्यांनी थिल्लाना मोहनम्बल नावाचा चित्रपटही लिहिला. यामध्ये सिवाजी गणेशन, पद्मिनी अशा बड्या कलाकारांनी काम केले.
त्यांनी कलइमणी या नावाने काही कादंबरींचे लिखाण केले आहे. त्यांनी रेडिओसाठी सुमारे १२० नाटके लिहिली आहेत. कोथामंगलम सुब्बू हे हरहुन्नरी कलाकार होते.
Join Our WhatsApp Community