Veer Savarkar : क्रांतिवीर भगतसिंग यांनी खरंच वीर सावरकर यांची भेट घेतली होती का?

295
  • सुनील पाटोळे/नित्यानंद भिसे

स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्र्यवीर’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाला मोठ्या संख्येने प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. राज्यभर देशप्रेमी जनता या चित्रपटाचे खास शो आयोजित करत आहे. चित्रपटात वीर सावरकर (Veer Savarkar) यांची भूमिका केलेले रणदीप हुड्डा हेच या चित्रपटाचे लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक आहेत. या चित्रपटासाठी हुड्डा यांनी इतिहासातील सर्व संदर्भ अभ्यासले. असा अभ्यासपूर्ण आणि तथ्यांवर आधारित हा चित्रपट बनला आहे, त्यामुळे या चित्रपटाचे सर्वांकडून कौतुक होत आहे.

वीर सावरकर-भगतसिंग यांच्या भेटीचे पुरावे उपलब्ध 

या चित्रपटात क्रांतिवीर भगतसिंग आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट झाल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र काही तथाकथित पुरोगामी आणि डाव्या विचारसरणीचे लोक स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) आणि भगतसिंग यांची भेट झालीच नव्हती, असे म्हणत आहेत. वस्तुतः ही भेट झाल्याचे साक्षी पुरावे उपलब्ध आहेत.

veer savarkar 5
भगतसिंग यांनी त्यांच्या दैनंदिनीमध्ये वीर सावरकर यांच्या ‘हिंदू पदपादशाही’ या ग्रंथातील विचार लिहून ठेवले होते.

क्रांतिवीर भगतसिंग यांच्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा प्रभाव होता, भगतसिंग यांनी त्यांच्या दैनंदिनीमध्ये वीर सावरकर यांच्या ‘हिंदू पदपादशाही’ या ग्रंथातील विचार लिहून ठेवले होते. याशिवाय क्रांतिवीर भगतसिंग आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भेटीचा उल्लेख स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्यासोबत असणाऱ्या वामनराव चव्हाण तथा बडी चव्हाण यांनी स्वतः लिहिलेल्या लेखामध्ये केलेला आहे.

(हेही वाचा Swatantra Veer Savarkar Movie : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयघोषाने माहिमचे सिटीलाईट सिनेमागृह दुमदुमले)

‘१८५७च्या स्वातंत्र्य-समर’ ग्रंथांच्या पुनर्मुद्रणाच्या परवानगीसाठी भेट

वामनराव चव्हाण हे स्वातंत्र्यवीर सावरकर  (Veer Savarkar) यांचे निकटवर्तीय मानले जात, जेव्हा वीर सावरकर यांना १३ वर्षे रत्नागिरीत स्थानबद्ध ठेवण्यात आले होते. त्या काळात वीर सावरकर यांच्या निष्ठावंतांमध्ये वामनराव चव्हाण हे अग्रभागी होते. वामनराव चव्हाण यांनी प्रज्वलंत या साप्ताहिकामध्ये ‘वीर सावरकर – क्रांतिकारी भगतसिंग यांची गुप्त भेट’ या शीर्षकाखाली लेख लिहिला. २८ मे १९७२ रोजी हा अंक प्रकाशित झाला होता.

veer3

त्या लेखामध्ये वामनराव चव्हाण यांनी म्हटले आहे की, रत्नागिरीला विठ्ठल मंदिराच्या वरच्या बाजूस आचरेकर यांच्या घरी त्यावेळी माझं ‘हिंदू शिवणकला गृह नावाचे शिवणकामाचे दुकान होते. रत्नागिरीला सावरकरांना भेटायला येणाऱ्यांना प्रथम त्या हिंदू शिवणकलागृहात यावे लागे. १९२८ या वर्षी सरदार भगतसिंग – स्वातंत्र्यवीरांच्या ‘१८५७चे भारतीय स्वातंत्र्य समर’ या क्रांतिकारक ग्रंथांची पुनरावृत्ती काढण्यासाठी परवानगी घेण्यासाठी रत्नागिरीला आले होते. त्यांना क्रांतिवीर बाबाराव सावरकर यांनीच ओळखपत्र दिले होते आणि त्यांच्याच मार्गदर्शनाप्रमाणे ते रत्नागिरीत प्रथम माझ्या दुकानात आले. अशा लोकांशी वीर सावरकरांची भेट ही रात्री ९ वाजल्यानंतर होत असे. भगतसिंग रत्नागिरीत एक दिवस होते. त्यांनी ‘१८५७ च्या स्वातंत्र्य-समर’च्या मूळ इंग्रजी ग्रंथाच्या पुनर्मुद्रणाची परवानगी तर मिळवलीच, पण आणखीही काही संजीवनी मिळवल्याप्रमाणे ते उत्तेजित होऊन परतले, हे मला माहित आहे. वामनराव चव्हाण यांनी लिहिलेल्या या लेखामध्ये स्पष्टपणे स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) आणि भगतसिंग यांच्या भेटीचा उल्लेख करण्यात आला आहे.

(हेही वाचा Swatantrya Veer Savarkar : स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपटाला दिल्लीकर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद)

भगतसिंगांच्या डायरीत वीर सावरकरांचे विचार 

क्रांतिवीर भगतसिंग यांनी त्यांच्यावर वीर सावरकर यांच्या विचारांचा प्रभाव होता, हे दाखवून दिले आहे. कारागृहात असताना भगतसिंग यांनी त्यांच्या दैनंदिनीमध्ये वीर सावरकर  (Veer Savarkar)  यांच्या ‘हिंदू पदपादशाही’ या ग्रंथातील विचार लिहून ठेवले होते. यावरून भगतसिंग हे वीर सावरकर यांच्या विचारांनी प्रभावित झाले होते हे स्पष्ट होते.

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.