दांडग्या ‘कृष्णा’नं केली कमाल! १ कोटींच्या बोलीनं मालक मालामाल

दरवर्षी बंगळुरुमधील कृषी मेळावा हा कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत राहतो. यंदा हा कृषी मेळावा 4 दिवस चालणार आहे. विशेषतः कर्नाटकातील एका बैलावर तब्बल 1 कोटींची बोली लागली आणि चर्चेला उधाण आले. कृष्णा असं या बैलाचं नाव असून बेंगळुरुतल्या कृषी मेळाव्यात हा बैल विक्रीसाठी आणण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बैलाला सिनेमात आणि शेतकऱ्यांमध्ये खूप मागणी आहे. या मेळाव्यात हा बैल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो असून लोकांनी त्याच्यासोबत सेल्फी काढल्याचे दिसतेय.

यंदा कोट्यवधींच्या कृष्णाने हा मेळावा चर्चेत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लीकर जातीचा कृष्णा हा बैल आहे. ज्याचे वीर्य खूप महाग आहे. कृष्णा हा सुद्धा एक देशी गोवंश आहे. देशी गायींपासून A2 पद्धतीचे दूध मिळते, जे दूध शहरांमध्ये 120 ते 150 रुपये लीटरपर्यंत विकले जाते. कृष्णा हा बैल साडेतीन वर्षांचा असून त्याची बोली १ कोटींवर पोहोचली आहे. तर जिथे इतर दांडगे बैल 2 ते 3 लाखांना विकले जात आहे. या मेळाव्यात आतापर्यंत लागलेली ही सर्वाधिक बोली असल्याचे म्हटले जात आहे. या बैलाचे वजन 800 ते 1 हजार किलोपर्यंत जाऊ शकतं. याची लांबी साडेसहा ते 8 फुटांपर्यंत असून याचं आयुष्य 20 वर्षांहून जास्त असल्याची माहिती कृष्णाच्या मालकांनी दिली आहे.

(हेही वाचा – ‘रेलयात्री ध्यान दे’! आठवडाभर ६ तास बंद राहणार रेल्वे आरक्षण; जाणून घ्या कारण)

बंगळुरुतल्या GKVK कॅम्पसमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या पहिल्याच दिवशी 60 हजारहून अधिक लोकांनी हजेरी लावली होती. तर दुसऱ्या दिवशी 1 लाख 10 हजाराहून अधिक लोकांनी या मेळाव्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या कृष्णाला भेट देण्यास आपली उपस्थिती दर्शविली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here