कृष्ण चंद्र गजपती (Krushna Chandra Gajapati) हे ओडीसा राज्याचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. ते ओडीसा येथील परलाखेमुंडी आणि पुरी जिल्ह्यातील देलंगा या इस्टेटीचे मालक होते. त्यांचं कुटुंब हे पूर्व गंगा राजवंशातले होते. ते ओडीसाचे पहिले पंतप्रधान होते. ओडीसा येथील गजपती जिल्ह्याचं नाव हे त्यांच्या नावावरूनच ठेवण्यात आलं होतं.
कृष्ण चंद्र गजपती (Krushna Chandra Gajapati) यांचा जन्म २६ एप्रिल १८९२ साली ओडीसा येथील परलाखेमुंडी येथे झाला. त्यांच्या वडिलांचं नाव गौरा चंद्र गजपती असं होतं. ते परलाखेमुंडी येथील सावकार होते. त्यांच्या आईचं नाव राधामणी देवी असं होतं.
कृष्ण चंद्र गजपती (Krushna Chandra Gajapati) यांचं प्राथमिक शिक्षण परलाखेमुंडी येथील महाराजा हायस्कूलमध्ये झालं. त्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी चेन्नई येथील न्यूइंग्टन कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं.चेन्नई येथे शिकत होते तेव्हाच कृष्ण चंद्र गजपती यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. आपलं शिक्षण पूर्ण करून ते आपल्या गावी परलाखेमुंडी येथे परत आले. त्यानंतर १९१३ साली खरसावन राज्याच्या राजकुमारीशी त्यांचं लग्न झालं. त्याच वर्षी २६ एप्रिल १९१३ साली त्यांना परलाखेमुंडी येथील पुढचे सावकार म्हणून घोषित करण्यात आलं.
महाराजा कृष्ण चंद्र गजपती (Krushna Chandra Gajapati) , उत्कल गौरव मधुसूदन दास, उत्कलमणी गोपबंधु दास, फकीर मोहन सेनापती आणि उत्कल संमेलनाच्या इतर मान्यवर सदस्यांनी त्या काळच्या बंगाल – बिहार प्रांतातल्या ओडिसी भाषेचा वापर करणाऱ्या सर्व भागांचे एकत्रीकरण करून वेगळ्या ओडिसा राज्याची मागणी केली. या उत्कल संमेलनाच्या प्रयत्नांनी शेवटी १ एप्रिल १९३६ साली वेगळ्या ओडिसा राज्याची स्थापना करण्यात आली. त्या दिवसापासून १ एप्रिल हा दिवस ओडिसी लोक उत्कल दिवस म्हणून साजरा करतात.
Join Our WhatsApp Community