मुंबईतील कुर्ला नेहरुनगर भागात सोमवारी रात्री 11:30 च्या सुमारास चार मजली इमारत कोसळली. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. या दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू झाला असून, चार जणांवर उपचार सुरू आहेत, तर ९ जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे.
इमारतीच्या कोसळलेल्या ढिगा-याखाली 20-25 लोक अडकले असण्याची शक्यता आहे. दरम्यान, या चारही इमारतींना मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस दिली होती. तरीही काही लोक तिथे राहत होते, असे असतानाही त्यात 8 ते 10 कुटुंबे राहत होती, सर्व भाडेकरु आहेत.
( हेही वाचा आदित्य म्हणतात, ‘त्यांना’ विधान भवनाची पायरी चढू देणार नाही! )
यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, आमचा अग्रक्रम आहे की सर्वांना वाचवणे. तसेच, जेव्हा जेव्हा बीएमसी नोटीस देईल तेव्हा त्वरित जागा रिकामी करा, जेणेकरुन अशी घटना घडू नये.