कुप्पळ्ळी वेंकटप्पा पुट्टप्पा यांना कुवेंपु म्हणून ओळखले जाते. ते कन्नड कवी, नाटककार, कथालेखक आणि टीकाकार होते. विशेष म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते पहिले कन्नड लेखक होते. कुवेंपू यांचा जन्म २९ डिसेंबर १९०४ रोजी चिकमंगळूर जिल्ह्यातील कोप्पा तालुक्यातील हिरेकोडिगे या गावात झाला.
सुरुवातीच्या काळात त्यांचे शिक्षण घरीच झाले. माध्यमिक शिक्षणासाठी ते तिर्थहल्ली येथील अँग्लो-व्हर्नाक्युलर शाळेत दाखल झाले. दुर्दैवाने ते १२ वर्षांचे असताना त्यांचे बाबा वारले. पुढे त्यांनी कन्नड आणि इंग्रजीतून शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी म्हैसूरच्या महाराजा कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले आणि १९२९ मध्ये पदवी प्राप्त केली.
कुवेंपू यांनी १९२९ मध्ये म्हैसूरच्या महाराजा कॉलेजमध्ये कन्नड भाषेचे लेक्चरर म्हणून आपल्या शैक्षणिक कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी १९३६ पासून सेंट्रल कॉलेज, बंगळुरूमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. १९४६ मध्ये ते म्हैसूरच्या महाराजा कॉलेजमध्ये पुन्हा प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
(हेही वाचा – Coronavirus : भारतात २४ तासांत ७०२ कोरोना रुग्णांची नोंद, सहा जणांचा मृत्यू )
१९५५ मध्ये ते महाराजा महाविद्यालयाचे प्राचार्य बनले. पुढे त्यांचा क्रम चढताच राहिला आणि १९५६ मध्ये त्यांची म्हैसूर विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून निवड झाली. या पदावर पोहोचणारे ते म्हैसूर विद्यापीठातील पहिले पदवीधर होते. नाटके, चरित्रे, कादंबर्या अनुवाद, कथा, कविता, आत्मचरित्र, निबंध, चित्रपट इत्यादी साहित्याच्या विविध प्रांगणात त्यांचा विहार होता.
कन्नड साहित्यातील त्यांच्या योगदानाबद्दल, कर्नाटक सरकारने त्यांना १९६४ मध्ये ‘राष्ट्रकवी’ची उपाधी दिली आणि १९९२ मध्ये कर्नाटक रत्न देऊन सन्मानित केले. १९८८ मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण प्रदान केले. त्यांनी कर्नाटकचे राज्य गीत ‘जया भारता जननिया तनुजाते’चे लेखन केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community