देशात कोळशाचा अभाव; राजधानी दिल्ली जाणार अंधारात?

सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. देशातील इतर भागांप्रमाणे राजधानी दिल्लीमध्ये विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. उष्णतेच्या लाटेचा तडाखा दिल्लीतही चांगलाच जाणवत असल्याने, दिल्लीमध्ये विजेच्या वापराचे प्रमाण गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पण कोळसा तुटवडा जाणवत असल्याने, वीज निर्मितीवर मर्यादा येत असल्याने, दिल्लीच्या इतर भागात भारनियमन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज निर्मीती कमी

यासाठी दिल्ली राज्य सरकारने एक परिपत्रक काढत पुढील काही दिवसांतच विजेचा तुटवडा जाणवत असल्याने, लोकांना भारनियमनाला सामोरे जावे लागणात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दिल्लीला 30 टक्क्यांपर्यंत वीज पुरवठा करणा-या दादरी -2 आणि उंचाहार या कोळशावर आधारीत वीज निर्मीती केंद्रांमध्ये कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज निर्मिती कमी केली जात आहे.

( हेही वाचा: मोठी बातमी! मुंबई एसी लोकलच्या तिकीट दरांत 50 टक्के कपात )

भारनियमन करण्याची वेळ 

दिल्लीतील मोठ्या प्रमाणात असलेल्या अतिमहत्त्वाच्या व्हीआयपी भागात भारनियमन करणे अशक्य आहे. ही सर्व परिस्थिती असताना कोळसा तुटवडा जाणवत असल्याने, वीज निर्मितीवर मर्यादा येत असल्याने, दिल्लीच्या इतर भागांत भारनियमन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here