एक्स्प्रेस गाड्यांचे लेडीज स्पेशल डबे काढले!

कोरोनानंतर उत्पन्नावर अधिकाधिक लक्ष केंद्रित केलेल्या रेल्वेने तोट्यातील अनेक उपक्रम बंद केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून एक्स्प्रेस गाड्यांचे लेडीज स्पेशल डबेही काढून टाकले आहेत. महिलांना प्रवासासाठी स्वतंत्र डबा मिळत नाही.

देशभरातील मेल व एक्स्प्रेस गाड्यांसाठी हा निर्णय लागू केला आहे. गाडीला सर्वांत शेवटी गार्डच्या डब्यालगत लेडीज स्पेशल डबा असायचा. एकट्याने प्रवास करणा-या महिलांना त्याचा मोठा आधार होता. शिवाय अन्य डब्यांतील गर्दीमध्ये जागा न मिळाल्याने महिला प्रवासीही लेडीज स्पेशल डब्याचे आरक्षण घेऊन प्रवास करायच्या. दिवसा धावणा-या एक्स्प्रेसमध्ये या डब्यांना विशेष गर्दी असायची. रात्री मात्र डबे बहुतांश रिकामेच असायचे. लाॅकडाऊनंतर रेल्वेने तोट्यातील उपक्रमांचा आढावा घेतला, त्यामध्ये रिकाम्या धावणा-या लेडीज स्पेशल डबेही काढण्यात आले. सध्या सर्व मेल व एक्स्प्रेसचे हे डबे काढून टाकले आहेत. फक्त दिव्यांगांसाठीचा अर्धा डबा शिल्लक ठेवला आहे.

( हेही वाचा: लोकमान्य टिळक टर्मिनसवर लवकरच रेस्टॉरंट ऑन व्हील्स )

…म्हणूनच हे डबे काढण्याचा निर्णय 

महिलांचा अल्प प्रतिसाद आणि गुन्ह्यांचे वाढते प्रमाण यामुळे लेडीज स्पेशल डबा बंद केल्याचे रेल्वे अधिका-यांनी सांगितले. लांब पल्ल्याच्या प्रवासात महिला सहसा एकटीने रेल्वेत येत नाहीत. पुरुष सोबत्यासोबत सर्वसामान्य डब्यातच बसतात. महिलांसाठीच्या डब्यात गुन्हेगारी कृत्येही वारंवार होत होती. म्हणूनच हे डबे काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here