पतीच्या निधनाने नाही, तर एका फ्लॅट धारकाच्या त्रासाला कंटाळून तिने उचलले ‘हे’ पाऊल!

स्थानिकांनी रंगवलेल्या चित्रावरुन रेश्मा हिने पतीच्या विरहातून हे पाऊल उचलले असल्याची चर्चा होती, पण...

145

तिने पतीच्या मृत्यूमुळे नाही तर इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांच्या जाचाला कंटाळून ७ वर्षांच्या मुलासह १२व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची घटना अंधेरी पूर्व येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका कुटुंबातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोरोनामुळे पतीचे निधन झाले, त्यामुळे हताश होऊन रेश्माने मुलासह आत्महत्या केल्याचे चित्र स्थानिकांनी रंगवले होते. मात्र तिच्या घरात पोलिसांना सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये ती राहत असलेल्या खालच्या मजल्यावरील एका कुटुंबाच्या जाचाला कंटाळून, तिने आत्महत्या केल्याचे खरे कारण समोर आले आहे.

(हेही वाचाः हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्या त्या ‘मौलवीं’च्या मुसक्या आवळल्या! )

काय आहे प्रकरण?

रेश्मा ट्रेंचिल(४४) या महिलेने सोमवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास अंधेरी पूर्व चांदिवली नहर अमृतशक्ती येथील ट्युलिपीया या इमारतीच्या १२व्या मजल्यावरुन सात वर्षांच्या मुलासह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या महिलेच्या पतीचे काही महिन्यांपूर्वीच कोरोनाने निधन झाले होते. पतीच्या निधनामुळे रेश्मा ही दुःखी होती, तिने हे दुःख फेसबूकवर मांडले होते. दरम्यान प्राथमिक चौकशीवरुन, तसेच स्थानिकांनी रंगवलेल्या चित्रावरुन रेश्मा हिने पतीच्या विरहातून हे पाऊल उचलले असल्याची चर्चा होती. मात्र साकिनाका पोलिसांनी रात्री तिच्या घराची झडती घेतली असता, रेश्माने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली.

म्हणून करत होते जाच

या चिठ्ठीत तिने खालच्या फ्लॅट क्रमांक ११०२ मध्ये राहणारे मोहम्मद आयुब खान, शादाब खान आणि शहनाज खान हे तिला मानसिक त्रास देत होते. मुलगा फ्लॅटमध्ये खेळतो म्हणून आम्हाला त्याच्या आवाजाचा त्रास होत असल्याचे सांगून, खान कुटुंब सतत सोसायटी तसेच पोलिस ठाण्यात आमच्या विरुद्ध तक्रार करत होते. पतीच्या निधनानंतर देखील त्यांचा जाच सुरुच होता. या जाचाला कंटाळून मी मुलासह आत्महत्या करत असल्याचे रेश्माने चिठ्ठीत म्हटले आहे. याप्रकरणी साकिनाका पोलिसांनी मोहम्मद आयुब खान, शादाब खान आणि शहनाज खान या तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणी तपास सुरू असल्याचे साकिनाका पोलिसांनी सांगितले.

(हेही वाचाः धक्कादायक! राजावाडी रुग्णालयाच्या आयसीयूत उंदराने रुग्णाचे डोळे कुरतडले! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.