घोटाळेबाज मेहुल चोक्सीला भारतात आणणार ‘या’ लेडी सिंघम

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन, लवकरच मेहुल चोक्सी हा भारताच्या ताब्यात असणार आहे.

62

पंजाब नॅशनल बँकेचे कोट्यावधींचे कर्ज बुडवून भारतातून पळून गेलेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला डोमिनिका येथून भारतात आणण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी आयपीएस अधिकारी शारदा राऊत यांच्या नेतृत्वाखाली ८ जणांचे पथक डोमिनिका येथे दाखल झाले आहे. तेथील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन, लवकरच मेहुल चोक्सी हा भारताच्या ताब्यात असणार आहे.

२०१८ पासून चोक्सी फरार

पंजाब नॅशनल बँक घोटाळा हे प्रकरण सीबीआय हाताळत असून, आयपीएस अधिकारी शारदा राऊत या सीबीआयच्या बँक घोटाळा प्रकरणाच्या प्रमुख आहेत. पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणाचा तपास सध्या शारदा राऊत यांच्या विभागाकडे आहे. भारतात पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा केल्यानंतर मेहुल चोक्सी हा परदेशात पळून गेला होता. २०१८ पासून तो एंटिगा मध्ये राहत होता. तेथून तो पळून गेला असता, त्याला डोमिनिका पोलिसांनी अटक करुन तुरुंगात डांबले आहे.

(हेही वाचाः धर्मांधांनी तिला धमकावले आणि नंतर कुस्करले! )

असं आणणार चोक्सीला भारतात

भारताने मेहुल चोक्सी याच्या प्रत्यार्पणासाठी डोमिनिका न्यायालयाला विनंती केली होती. तेथील न्यायालयाने चोक्सीला भारताच्या ताब्यात देण्यासाठी हिरवा कंदील दाखवताच, चोक्सीला भारतात आणण्यासाठी मागील आठवड्यापासून हालचाली सुरू होत्या. अखेरीस त्याला भारतात आणण्यासाठी बँक फ्रॉड प्रकरणाच्या प्रमुख आयपीएस अधिकारी शारदा राऊत यांच्या नेतृत्वाखाली, ८ जणांचे पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक डोमिनिका न्यायालयात मेहुल चोक्सी विरोधातील गुन्ह्यांची कागदपत्रे, तो भारतीय नागरिक असल्याचे अॅफिडेव्हीट सादर करणार आहे. त्यानंतर खाजगी जेट विमानाने चोक्सीला लवकरच भारतात आणण्यात येणार आहे.

कोण आहेत शारदा राऊत?

शारदा राऊत या २००५च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील शारदा राऊत या पालघर जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक होत्या. पालघरमध्ये गुन्हेगारीवर त्यांनी नियंत्रण मिळवले होते. मुंबई पोलिस दलात पोलिस उपायुक्त म्हणून त्यांनी पोलिस आयुक्त मुख्यालयाची जवाबदारी सांभाळली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.