Lakhimpur kheri case: साक्षीदारावर गोळीबार

164

भारतीय किसान युनियनचे नेते आणि लखीमपूर खीरी हिंसाचाराचे साक्षीदार दिलबाग सिंग यांच्यावर दोन अज्ञात मोटारसायकलस्वार हल्लेखोरांनी हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. भारतीय किसान युनियनचे जिल्हाध्यक्ष दिलबाग सिंग हे अलिगंज- मुदा रस्त्याने कारने घराकडे परतत असताना, हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सुदैवाने दिलबाग सिंग या हल्ल्यात जखमी झाले नाहीत.

3 ऑक्टोबर, 2021 रोजीच्या तिकुनिया हिंसाचारात चार शेतकरी आणि एका पत्रकारासह 8 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आशिष मिश्रा यांना अटक करण्यात आली आहे. आशिष हे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आहेत. दरम्यान, तक्रारीवरुन एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

( हेही वाचा: पाकिटात ११ किंवा १००१ असेच का दिले जातात? ही आहेत त्या वरच्या 1 रुपयामागची कारणे )

काय घडले नेमके

  • दिलबाग सिंग यांनी सांगितले की, हल्लेखोरांनी माझ्या कारचे टायर पंक्चर केल्याने मला वाहन थांबवावे लागले. हल्लेखोरांनी कारचा दरवाजा आणि खिडक्या उघडण्याचा प्रयत्न केला. दरवाजा आणि खिडक्या उघडल्या नाहीत म्हणून त्यांनी काचेवर दोन गोळ्या झाडल्या.
  • कारमध्ये मी एकटाच होतो. हल्लेखोरांचा इरादा ओळखून ड्रायव्हर सीट दुमडून मी खाली वाकलो. कारमधील माझी स्थिती त्यांना पाहता न आल्याने हल्लेखोर मोटारसायकलवरुन पसार झाले, असे दिलबाग सिंग म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.