लोक वर्षभर दिवाळीची वाट पाहतात, दिवाळीच्या (Lakshmi Pujan 2023) आधीपासून तयारीला सुरूवात करतात. 5 दिवसांच्या दीपोत्सव उत्सवादरम्यान, लोक घर सजवतात, दिवे लावतात, नवीन कपडे घालतात, विविध प्रकारचे पदार्थ आणि मिठाई खातात.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवाळीच्या दिवशी आपण धनसंपत्तीची देवी लक्ष्मी, श्रीगणेश, कुबेर आणि देवी सरस्वती यांची पूजा (Lakshmi Pujan 2023) करतो. मात्र ही पूजा कधी आणि कशी करावी याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतात.
त्यामुळेच आता आपण लक्ष्मीपूजनेचा (Lakshmi Pujan 2023) मुहूर्त आणि पद्धत जाणून घेणार आहोत.
(हेही वाचा – Halal Free Diwali : दिवाळीची खरेदी करताय, सतर्क रहा…)
पंचागानुसार, 12 नोव्हेंबर 2023 रोजी लक्ष्मी गणेशाच्या पूजेचा शुभ मुहूर्त (Lakshmi Pujan 2023) हा संध्याकाळी 5:40 पासून सुरू होऊन 7:36 पर्यंत असेल. मात्र महानिशीथकालचा शुभ मुहूर्त रात्री 11:49 ते 12:31 पर्यंत असेल.
देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी सर्वात शुभ मुहूर्त (Lakshmi Pujan 2023) हा निशीथकालचा मानला जातो. या काळात देवी लक्ष्मीची पूजा केल्याने अपार सुख आणि समृद्धी प्राप्त होते. यंदा दिवाळीत ग्रह-ताऱ्यांची स्थिती अतिशय शुभ असणार आहे. अशा वेळी एखाद्या शुभ मुहूर्तावर विधीनुसार लक्ष्मीची पूजा (Lakshmi Pujan 2023) केल्याने खूप मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो.
(हेही वाचा – Share Market : शेअर बाजार दिवाळी ‘मुहूर्त ट्रेडिंग’ची ‘ही’ आहे शुभ वेळ, वाचा सविस्तर…)
लक्ष्मीपूजन पद्धत
देवी लक्ष्मीची स्थापना : लक्ष्मीपूजेसाठी लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करावी. आसनावर लाल कपडा पसरवावा आणि नंतर चौकीच्या मध्यभागी मूठभर तांदूळ ठेवावे.
कलशाची स्थापना : दिवाळीला लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी कलशाची स्थापना करण्याची परंपरा आहे. तांदूळाच्या मध्यभागी तांबे, पितळ किंवा चांदीचा कलश ठेवावा. 3/4 भांडे पाण्याने भरा आणि त्यात झेंडूची फुले आणि तांदळाचे काही दाणे घाला. एक नाणे, 1 अख्खी सुपारी ठेवा. कलशाच्या तोंडावर आंब्याची पाच पाने ठेवा. या आंब्याच्या पानांवर छोटे ताट ठेवा आणि हळदीपासून कमळाचे फूल तयार करा.
लक्ष्मी-गणेशाची मूर्ती : पूजेच्यावेळी लक्ष्मी-गणेशजींची (Lakshmi Pujan 2023) मूर्ती किंवा चित्र पूजेच्या मध्यभागी ठेवावे. लक्षात ठेवा की मूर्ती कलशाच्या नैऋत्य दिशेला ठेवावी. यानंतर आरतीचे छोटे ताट देवी लक्ष्मीसमोर ठेवा, तांदळावर हळद लावून कमळाचे फूल करा. तुम्ही नाणी, नोटा, सोन्याची नाणी, दागिने देखील पूजेसाठी ठेवू शकता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community